– आजी-माजी शहराध्यक्ष १० ते १२ जणांना घरचा रस्ता दाखवणार
पिंपरी चिंचवड : पाच वर्षांपूर्वी भाजपाच्या तिकीटावर नगरसेवकपदाचे लेबल लावले. पण, काम दाखवता आले नाही, अशा १० ते १२ जणांचा पत्ता आगामी महापालिका निवडणुकीत कट करण्याची भूमिका भाजपाच्या दोन्ही आमदारांनी घेतलीय. त्यामुळे अनेकांची अस्वस्थता वाढली असून, सुरक्षित जहाजात उड्या मारण्याची भूमिका अनेकांनी घेतलीय. भाजपातील अस्वस्थांची पळापळ सुरू झाली असून, राष्ट्रवादीतील निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांचा तिकीटासाठी बळी दिला जाणार..यावर शिक्कामोर्तब झालेय.
सात मार्चनंतर दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होणार; चंद्रकांत पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट
भाजपाच्या दोन नगरसेवकांनी नुकताच राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीची वाट धरली. भोसरी अर्थात बोऱ्हाडेवाडी आणि जाधववाडी परिसरातून वसंत बोराटे आणि चिंचवडमधील चंदा लोखंडे यांनी राजीनामा दिलाय. भाजपाच्या दोन्ही आमदारांच्या कारभाराला कंटाळून राष्ट्रवादीची वाट धरलीय…असं सांगितलं जातंय. भाजपातील नाराजांना सोबत घेवून राष्ट्रवादीत खोगीर भरती चालुये.
आयुक्तावरील शाईफेक प्रकरण; आमदार रवी राणा यांना न्यायालयाकडून ट्रान्झिट बेल मंजूर
भाजपाच्या आमदारांनी गल्ली-बोळातही ओळख नव्हती. त्यांना तिकटे दिली. नगरसेवक केले. पदे दिली. नवीन चेहऱ्यांना संधी दिली. अनेकांना आपल्या कामाची चुणूक दाखवता आली नाही. प्रभागात विकासकामे झाली नाहीत. नागरिकांनी थेट आमदारांकडे तक्रारी केल्या. भाजपा आणि आमदारांच्या कृपेने सभागृहात प्रवेश केलेल्यांना भाजपा आता नकोसा झालाय… भाजपातून राष्ट्रवादीच्या जहाजात उडी कारणाऱ्यांची संख्या २० ते २५ सांगीतली जातेय. त्यापैकी ४ ते ५ जण स्वयंभू आहेत बाकी निव्वळ डोकी मोजण्याचा प्रकार आहे. राष्ट्रवादीचं जहाज आता भरकटायला लागलंय. भाजपातील कथित ‘मास्टर माइंड’आता राष्ट्रवादीच्या गळाला लागलाय. त्यानुसार आता स्ट्रेटेजी आखली जात आहे. मास्टर माइंड आणि बॉसच्या रिमोटवर चालणारे शहराध्यक्षही मिळाले आहेत. प्रत्येक आठवड्याला भाजपामधील एका नाराजाचा राजीनामा आणि गुरूवारी मुंबई पक्षप्रवेश असे सूत्र आहे. त्याद्वारे भाजपा धक्का..झटका… अशा बातम्यांचे पेरणीही सुरूय. प्रसारमाध्यमांना अक्षरश: वेड्यात काढलं जातंय.
वाचाळवीर, शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या संजय राऊतांचा उधळलेला वारू महाविकास आघाडी रोखणार का ?
भाजपातून आपल्याला उमेदवारी मिळणार नाही, याची गॅरंटी असलेल्यांनी शहराध्यक्ष अजित गव्हाणेंद्वारे थेट अजित पवारांकडे फिल्डिंग लावलीय. वास्तविक, एकाहीला तिकीटाबाबत शब्द स्वत: अजित पवारांनी दिलेला नाही. निवडणुकीच्या वेळी पाहू… पक्षाचे काम करा…असा संदेश अजितदादा देताहेत. भाजपामध्ये ज्यांना संधी मिळणार नाही, अशांना पक्षात घेवून राष्ट्रवादी निष्ठावंत आणि प्रामाणिक काम करण्यांची तिकीटे कापणार…असा संदेश राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलाय.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून दरोडेखोरांचं टोळकं सत्तेत आलंय – राजू शेट्टी
भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी एक वर्षापासूनच 2022 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुन्हा एकदा भाजपाची सत्ता आणण्यासाठी कंबर कसली आहे. शहरात अतिशय सूक्ष्म पातळीवर भाजपची यंत्रणा कार्यरत असून काही नगरसेवकांच्या पळापळीने पक्षाला कोणताही फरक पडणार नाही, असेच चित्र आहे. कारण, आमदार सोबत होते आणि भाजपाला मानणारा मतदार होता म्हणून अनेकांना नगरसेवक होता आले… पद भूषविता आली… आता नदीच्या पल्याड गेल्यावर निष्क्रीय नगरसेवकांना भाजपा नकोशी झालीय. पण, परिणामहिन लोकांचा भाजपाला खरंच फटका बसणार का? याचे चिंतन होणे अपेक्षीत आहे. राष्ट्रवादीच्या जहाजाची दिशा भरकटली आहे. पिंपरी-चिंचवडच्या राजकारणाचा समुद्र आता खवळला आहे. या समुद्रात क्षमता नसलेल्या आणि डोकी मोजण्यापुरत्या असलेल्या नगरसेवक खलाशांना सोबत घेवून अजितदादा सत्ता मिळवू पहातायत का? हा आत्मचिंतनाचा विषय आहे. राष्ट्रवादीचे रथी-महारथी यावर निश्चितपणे चिंतन करतील, अशी किमान अपेक्षा आहे.
Read also:
- …म्हणून कमळाबाई ती लाविते काडी; मलिकांवरील ईडीच्या कारवाईनंतर अमोल कोल्हेंची कविता व्हायरल
- मोठ्या नेत्यांची नावे बाहेर काढल्याने ईडीकडून ‘राग’ काढण्याचा प्रकार सुरु : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
- महाराष्ट्रातील ड्रग्ज प्रकरण गुजरातमध्ये जाईल, या भीतीने नवाब मलिकांवर कारवाई- रोहित पवार
- गुंठेवारी कायद्यानंतर जाहिरातबाजी अन् राष्ट्रवादी स्थानिक नेते ‘सपशेल फेल’
- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपसोबत लढणार- रामदास आठवले