मुंबई : भाजप नेते किरीट सोमैया यांनी पेटवलेल्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेनंतर महाराष्ट्रातील राजकारण एका वेगळ्या वळणावर जाऊन ठेपले आहे. शिवसेना नेते संजय राऊत हे सोमैयांना थोपवण्याचे काम करत आहेत. मात्र त्यांची जीभ वारंवार घसरताना दिसत आहे. च्युतिया, गांडू असे शब्द प्रयोग शिवसेना नेते संजय राऊत वारंवार आणि जाणून बुजून करताना दिसत आहे.
भXXचा अर्थ संजय राऊतला कळतो का? भाजप नेते किरीट सोमय्या संतापले
महाराष्ट्राच्या राजकारणाला दिग्ग्ज नेत्यांची संस्कृती लाभलेली आहे. महाराष्ट्राने सुसंस्कृत राजकारणी याआधी पाहिलेले आहेत आणि नंतरही पाहतील मात्र सध्या संजय राऊतांसारखे वाचाळवीरच चर्चेत आहेत. संपूर्ण मीडिया देखील अशाच विचारविरांच्या पत्रकार परिषदा घेण्यात व्यस्त असल्याचं चित्र समोर आलं आहे.
२०२४ ला तिसरी आघाडी होणार, भाजपला सत्तेतून हद्दपार करणार; नवाब मलिकांचा दावा
संजय राऊतांनी मागील काही दिवसांमध्ये मी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पत्रकार परिषद घेणार आणि भाजपच्या साडेतीन भ्रष्टाचारी नेत्यांची पोलखोल करण्याची घोषणा केली होती. यामध्ये त्यांनी काहीही न समोर आणता किरीट सोमैयांना शिव्या देण्याचे काम केले. त्यांना या पत्रकारपरिषदेत राऊतांनी ‘भडवा, दलाल’ असे संबोधले.
मी पाटील आहे, संजय राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो, पण…; चंद्रकांत पाटील
त्यानंतर पुन्हा एकदा संजय राऊतांनी केसीआर यांच्या दौऱ्याबद्दल बोलत असताना किरीट सोमैयांना ‘गांडू’, ‘च्युतिया’ असं देखील म्हणलं. संजय राऊत हे बेतालसारखे वक्तव्य करत आहे. त्यांचा उधळलेला वारू रोखण्याची हिंमत महाविकास आघाडीतील एकही नेता करताना दिसत नाहीये. एवढंच नाही तर याआधी देखील संजय राऊतांनी महिलांबाबत आक्षेपार्ह विधाने केलेली आहेत. संजय राऊत यांनी सप्टेंबर २०२० मध्ये त्याने अभिनेत्री कंगना राणौतला ‘हरामखोर’ देखील म्हटले होते. आता आगामी काळात संजय राऊतांना रोखले जाते की त्यांची शिव्यांची परंपरा सुरु राहते हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहेत.
Read also:
- लढा एसटी विलिनीकरणाचा; संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर आज होणार फैसला
- सैन्य तयार ठेवा, २०२४ला राष्ट्रवादी प्रत्येक बुथवर प्लस असणार; जयंत पाटलांचे कार्यकर्त्यांना आदेश
- 35 मिसळ खाण्याच्या कल्पनेनेच कसं तरी झालं; रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा
- देवेंद्र फडणवीसांना नैराश्य आलयं, जास्त लक्ष देवू नका – आदित्य ठाकरे
- खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर राडा; भाजप – काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा आमने-सामने