पुणे : मी कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावचा पाटील आहे. संजय राऊत यांच्यापेक्षा भयानक भाषेत मी बोलू शकतो. पण त्यांना कळेल म्हणून तशी भाषा वापरणे ही माझी संस्कृती नाही,’ अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.
च्युतिया, गांडू हे शब्द सौम्य भाषेतीलच; संजय राऊतांचा नवा जावई शोध
तेलंगणचे मुख्यमंत्री मुंबईत आले व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटून भाजपाविरोधी प्रादेशिक पक्षांची आघाडी तयार करण्याची चर्चा केली. त्याविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारलं असता 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी असेच बिगरभाजपा पक्षांचे महागठबंधन तयार केले होते. आता भाजपाला बहुमत मिळणार नाही अशी हवा निर्माण केली होती. तरीही त्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाच्या जागा वाढून पक्षाला 303 जागांसह पूर्ण बहुमत मिळाले. 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा आणखी वाढतील. पण भाजपाविरोधी पक्षांनी आशा ठेवायला आणि प्रयत्न करायला हरकत नाही. शिवसेनेला गोव्याच्या गेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण 792 मते मिळाली होती. तरीही यावेळी त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केलाच, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनाही त्यांनी प्रतित्युत्तर दिलं आहे. 2024मध्ये काँग्रेसला बाजूला ठेऊन सगळे एकत्र येणार आहेत. त्यामुळे शुभारंभालाच फाटाफूट झाली आहे. उद्घाटनाचा नारळ फोडतानाच फाटाफूट ठरलेली आहे. 2024 ला बँडबाजा वाजणारच आहे. राजकारणात स्वप्न बघायला काही हरकत नसते, असा टोला त्यांनी लगावला.
Read also:
- २०२४ ला तिसरी आघाडी होणार, भाजपला सत्तेतून हद्दपार करणार; नवाब मलिकांचा दावा
- भXXचा अर्थ संजय राऊतला कळतो का? भाजप नेते किरीट सोमय्या संतापले
- लालू प्रसादांना दणका; न्यायालयाने सुनावला ६ वर्षाचा कारावास, काय आहे चारा घोटाळा प्रकरण….
- उस्मानाबाद जिल्हा बँकेत भाजपचा सुपडा साफ; महाविकास आघाडीचा १५-०ने मोठा विजय
- महाविकास आघाडीचा प्रयोग अपयशी होणार, भाजपच नंबर वन – देवेंद्र फडणवीस