औरंगाबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. केसीआर यांनी भाजपवर निशाणा साधत भाजपला देशातून हद्दपार करा अन्यथा देश उद्ध्वस्त होईल, भाजपला सत्तेतून हटवण्यासाठी राजकीय शक्तींनी एकत्र येण्याचं आवाहन चंद्रशेखर राव यांनी केलं होतं. यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सिंधुदुर्गात आतापर्यंत ७ हत्या, राजकीय हत्यांची चौकशी करा; विनायक राऊतांची गृहमंत्र्याकडे मागणी
एका राज्याचे मुख्यमंत्री येऊन एका राज्यातील मुख्यमंत्र्यांना भेटणे ही काही नवीन गोष्ट नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना सुद्धा तेलंगणाचे मुख्यमंत्री मला येऊन भेटले होते, या सगळ्या लोकांनी मागच्या लोकसभेला सुद्धा हातात हात घालून एकत्र आले होते. मात्र त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही.
किरीट सोमय्यांचा तीन पैशांचा तमाशा; महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या
उत्तर प्रदेशात आणि देशाच्या विविध राज्यात हा प्रयोग त्यांनी केला मात्र उपयोग झाला नाही. तेलंगणा मध्ये त्या पार्टी ची अवस्था बारी नाही, लोकसभेत भाजपच्या 4 जागा तिथं निवडून आल्या पुढच्या निवडणुकीत आम्ही तिथला सगळ्यात मोठा पक्ष असू असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातून पार्थ पवार ‘साईड स्ट्राईक’; भूमिका ठरवण्याची हिच ती वेळ!
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्याची मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. यावर बोलताना राज्यात सुडाचं राजकारण सुरु असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. रोज काय होतं आहे ते सगळे उघड्या डोळ्यांनी पाहताय, राणेंवर त्यांच्या मुलांवर किरीट सोमय्यांवर, रवी राणा यांच्याबाबत काय सुरुय लोक पाहताय. त्यांची निराशा या सूडाच्या राजकारणातून बाहेर पडतेय असं ही फडणवीस म्हणाले.
Read also:
- पुणे मनपा निवडणुकीसाठी भाजपाची प्रचारात आघाडी; चंद्रकांत पाटीलांचा नव्याने समाविष्ट गावात झंझावाती प्रचार
- च्युतिया, गांडू हे शब्द सौम्य भाषेतीलच; संजय राऊतांचा नवा जावई शोध
- नारायण राणे विरुद्ध मातोश्री संघर्ष; केंद्राने राणेंच्या ‘नीलरत्न’ बंगल्याचा घेतला बळी
- च्युतिया, गांडू म्हणण्यापेक्षा एकदा शिव्यांची डिक्शनरीच देऊन टाका; किरीट सोमैयांचा संजय राऊतांना सल्ला
- हे लोक चु, अशा चु* लोकांना देशात स्थान राहणार नाही; संजय राऊतांची जीभ घसरली*