पिंपरी चिंचवड : लोकसभा निवडणुकी मावळ मतदार संघातून शिवसेनेच्या अनुभवी उमेदवाराला आव्हान देणाऱ्या पार्थ पवारांचा पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विसर पडला आहे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आगामी २०२४ ची निवडणूक दोन वर्षांवर असताना स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हा आत्मकेंद्री विचार पार्थ पवार यांच्या राजकीय भवितव्याला मारक ठरणार, असे चित्र आहे.
“सो सोनार की एक लोहार की” संजय राऊतांनी दिले ‘राजकीय’ युद्धाचे संकेत
सडेतोड आणि स्पष्ट विचारांचा आणि नव्या पिढीचा संवेदनशील चेहरा…अशी पार्थ पवारांची ओळख. अगदी नव्या असलेल्या पार्थ यांनी २०१९ मध्ये शिवसेनेकडून खासदार असलेल्या श्रीरंग बारणे यांना दोनहात केले. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या लढतीत पार्थ पवारांनी तब्बल ५ लाख ४ हजारहून अधिक मते मिळवली. घाटाखाली आणि घाटाच्या वर असे या मतदारसंघाचे स्वरुप आहे. घाटच्या वर पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदार संघातील स्थानिक नेत्यांनी स्थानिक आणि बाहेरचा वाद निर्माण केला. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी पक्षाच्या उमेदवारांचे काम केले नाही. पिंपरी आणि चिंचवडमधील स्थानिक नेत्यांनी दिवसा राष्ट्रवादी आणि रात्री शिवसेना चालवली.
जितेंद्र नवलानी कोण? हे नाव ऐकून ईडीच्या अधिकाऱ्यांनाही घाम फुटेल – राऊत
राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्या ताकदीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौरपद भूषवलेल्या दोन दिग्गजांतर केवळ आर्थिक रसद मिळाली नाही म्हणून उघडपणे काम केले नाही. पार्थ पवार यांच्यासोबत फिरणाऱ्या चार-पाच कथित निष्ठावंतानी प्रचाराची दिशा भरकटवली. नव्या पार्थ यांच्या ही बाब लक्षात आली नाही. ‘युवराज’… काम करावे लागेल… निर्णय लादला जातोय… असा अपप्रचार अप्रत्यक्षपणे पक्षाच्याच लोकांनी केला. मग काय..? निवडणुकीत लागायचा तो निकाला लागला.
कुख्यात गुंड गजानन मारणेच्या पत्नीचा राष्ट्रवादीत प्रवेश; राजकीय वर्तुळात खळबळ
आता पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी कात टाकतेय. संघटनेत बदल केले आहेत. नवे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि राष्ट्रवादीचे संकटमोचक माजी महापौर योगेश बहल यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दोन दिवसांपूर्वी मोठा मोर्चा काढला. परंतु, या मोर्चात पार्थ कुठेच दिसले नाहीत. गेल्या तीन वर्षांत शहरातील राजकारणावर बारिक लक्ष असलेल्या पार्थ यांना अचानक बाजुला ठेवण्यात आले. पार्थ स्वत: लक्ष घालत असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड विधानसभा मतदार संघाची जबाबदारी आता मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे देण्यात आली.
वसंत बोराटेंच्या प्रवेशामुळे मोशीत सेना-राष्ट्रवादीमध्ये उभी फूट; इच्छुकांचा पत्ता होणार कट !
महापालिकेतील भ्रष्टाचारविरोधात मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये विलास लांडे यांच्यापासून मंगला कदम यांच्यापर्यंत सर्वांनी भाषणे झाडली. पण, अजित गव्हाणे वगळता एकानेही पार्थ यांच्या नावाचा साधा उल्लेखही केला नाही. पार्थ पवार २०१९ मध्ये राजकारणात सक्रिय झाले. पार्थ पवार सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे केली जात आहेत. पार्थ यांच्या एन्ट्रीमुळे अजित पवारांच्या दरबारात दुय्यम स्थान मिळालेल्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. वर्षानुवर्षे अजित पवारांच्या भोवती कडे केलेल्या ज्येष्ठ-श्रेष्ठांमुळे नव्या लोकांना संधी मिळत नव्हती. गेल्या तीन-चार वर्षांत नव्यांना संधी द्या…असा सूर होता. पार्थ पवारांच्या माध्यमातून अनेकांना संधी मिळेल, अशी भाबडी आशा होती.
शिवसेनेच्या आणखी एका घोटाळ्याची पोलखोल करणार; भाजप आमदार मिहिर कोटेंचा इशारा
पण, नव्या संघटनात्मक बदलांमध्ये पार्थ टीमला सोईस्कर बाजूला ठेवण्यात आले. माजी आमदार विलास लांडे आणि माजी महापौर योगेश बहल यांच्या रिमोटवर चालणाऱ्या अजित गव्हाणे यांना शहराध्यक्षपदाची धुरा सोपवली. महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या निकटवर्ती असलेल्या कविता आल्हाट महिला शहराध्यक्षा आहेत. योगेश बहल यांच्या मर्जीतील इम्रान शेख युवकाध्यक्ष आहेत. २०१९ मध्ये पार्थ पवारांसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आणि श्रीरंग बारणे यांचा विरोध पत्करलेल्या एका मोठ्या फळीला नव्या बदलांमध्ये बाजुला ठेवले. अन्याय केला, असा संदेश आता राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला आहे. महामोर्चा काढून स्टंटबाजी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी पवार कुटुंबियांच्या दोन पिढ्यांनी शहर घडवले असा गळा काढला. मग, पार्थ पवार तुमच्या शहराचा चेहरा का होवू शकत नाही, असा प्रश्न आहे.
कल्याण-डोंबिवलीत भाजपला धक्का; चार माजी नगरसेवकांनी हाती घेतला धनुष्यबाण
विषय थेट आहे… पार्थ पवार आणि राष्ट्रवादीच्या प्रदेश नेतृत्त्वाने पक्षातील फितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढाई जिंकण्याची स्वप्ने पाहू नयेत. पिंपरी-चिंचवडमधून पवार कुटुंबियांना हद्दपार करण्याचा डाव आहे. तो ओळखावा… स्थानिक नेत्यांनी रचलेल्या सापळ्यात अजित पवार आणि पार्थ पवार अडकले आहेत.
मी तर भाजीवाला माणूस, त्या चंद्रकांत पाटलांनी…; छगन भुजबळांनी काढला चिमटा
२०१९ मध्ये पक्षातील फितुरांमुळे कधी नव्हे तो पवार कुटुंबियांना परावभ बघावा लागला. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील १३९ जागांसाठी इच्छुक असलेल्या सुमारे ६०० जणांच्या पत्रकांद्वारे आणि प्रचाराद्वारे पार्थ पवार घराघरांत पोहोचणे अपेक्षीत आहे. त्याचा फायदा २०२४ मध्ये होणार आहे. पण, राष्ट्रवादीने पुन्हा सरदार- वतनदारांच्या हातात सूत्रे दिली. त्यांनी आपल्याला हवे तेच उमेदवार निवडून येतील, अशी आखणी केली. निवडणून येणाऱ्या लोकांवर सरदार-वतनदारांचे उपकार आहेत. मग, लोकसभा निवडणुकीत पुन्हा २०१९ ची पुनरावृत्ती होणार हे निश्चित… त्यामुळे पार्थ यांनी वेळीच सावध झाले पाहिजे.
२०१९ मध्ये ज्यांनी पार्थ पवारांच्या निवडणुकीसाठी चपला झिजवल्या. गावकी-भावकी सोडून पक्षाचे प्रामाणि ककाम केले . त्यापैकी संजोग वाघेरे, राजू मिसाळ, वैशाली काळभोर, विशाल वाकडकर, सुलक्षणा शिलवंत यांचा अक्षरश: प्रभाग रचना करतानाही बंदोबस्त केलाच. पण, गरज नसतानाही संघटनेतून अनेकांना हद्दपार करुन एकप्रकारे बक्षीसी दिली. ज्यांनी राष्ट्रवादीला सत्तेतून पायउतार केले. त्याच भाजपामधील काही लोकांना पक्षात घेवून सत्ता मिळवण्यासाठी पायघड्या घातल्या जात आहे, हा संदेश राष्ट्रवादीत विस्फोट करणारा आहे.
परिणाम स्पष्ट आहे… २०२४ मध्ये पार्थ पवार यांनी लोकसभा लढवणार किंवा नाही. याबाबत निर्णय घेतला पाहिजे. नाहीतर २०१९ प्रमाणे आपल्याच पक्षातील नेते आणि स्थानिक आत्मकेंद्री पुढारी पार्थ पवारांचाच ‘करेक्ट कार्यक्रम ’करणार आहेत. हीच वेळ आहे सावध होण्याची आणि पिंपरी-चिंचवडसह मावळ लोकसभा मतदार संघाची राजकीय दिशा ठरवण्याची… कारण वेळ पुन्हा येत नाही.. !
Read also:
- किरीट सोमय्यांचा तीन पैशांचा तमाशा; महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या
- सिंधुदुर्गात आतापर्यंत ७ हत्या, राजकीय हत्यांची चौकशी करा; विनायक राऊतांची गृहमंत्र्याकडे मागणी
- एखाद्याला मुलगा झाला, तरी काही जण श्रेय घेतात; देवेंद्र फडणवीसांचा रोख कुणाकडे?
- “रिश्ते में हम आपके बाप लगते है”, संजय राऊतांचा किरीट सोमय्यावर खोचक निशाणा
- नितेश राणेंचे संचाकलपद धोक्यात येण्याची शक्यता ; जिल्हा बँकेचा थकीत असल्याने राणेंची अडचण होणार?