मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नाशिकमधील येवला येथे विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांना राज्यात तसंच पाच राज्यांमधील निवडणुकीवर भाष्य केलं. पाच राज्यांमध्ये भाजपाला यश मिळेल का माहिती नाही मात्र सत्तेत लोकशाही मानणारे लोक हवेत असं मत व्यक्त केलं. तसंच मोदी सरकारवर जोरदार टीकाही केली.
“विकासाच्या मुद्यावर राजकारण व्हावे, १५ वर्षे विरुद्ध ५ वर्षे असा सामना व्हावा”आमदार महेश लांडगे
पाच राज्यात निवडणुका सुरू असून भाजपाला यश मिळेल का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मी काय भविष्यकार आहे का? त्या चंद्रकांत पाटलांनी सध्या भविष्यकामं सुरु केलं आहे. पूर्वी जोशीबुवा भविष्य सांगायचे, आता पाटीलबुवा सांगतायत. मी तर भाजीवाला माणूस”.
टीका करतात आणि कोकणात येऊन पडतात; उदय सामंतांचा नाव न घेता राणेंवर प्रहार
पुढे ते म्हणाले की, “भाजपाने काही काम केलं नाही. पंडित नेहरुंना शिव्या घालण्याशिवाय दुसरा काही धंदा राहिलेला नाही. सगळा देश विकून टाकण्याचं काम सुरु आहे. फक्त विरोधी पक्षाविरोधात यंत्रणा कामाला लावत असून हे लोकशाहीत योग्य नाही. त्यामुळे लोकशाही मानणारे सत्तेत हवेत”. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या कोर्लई गावातील बंगले पाहण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या गेले होते. यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “संजय राऊत यांनी बस करुन जाऊ असं म्हटलं आहे. काल मी काही प्रसारमाध्यमांमध्ये पाहिलं तर त्यात बंगले दिसत नव्हते. पडलेल्या भिंती दिसत होत्या”.
नारायण राणेंना मुंबई महापालिकेचा दणका; अनाधिकृत बांधकामप्रकरणी पालिकेची नोटीस
भुजबळांच्या घराची पाहणी केल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांना नोटीस देण्यात आली आहे. याबद्ल बोलताना ते म्हणाले की, “सांताक्रूझ येथे पुनर्बांधणीत बांधलेली इमारत आहे. किरीट सोमय्या काही लोकांना त्या घरी गेले होते. पोलिसांनी करोना असल्याने गर्दी करु नये अशी विनंती केली होती. त्यांनी ऐकलं नव्हतं म्हणून नोटीस बजावण्यात आली आहे. किरीट सोमय्या राज्यातील आणि देशातील प्रसिद्ध नेते असल्याने त्यांची तब्येत बिघडू नये हे पोलीस आणि सरकारचं काम आहे”.
Read also:
- कल्याण-डोंबिवलीत भाजपला धक्का; चार माजी नगरसेवकांनी हाती घेतला धनुष्यबाण
- शिवसेनेच्या आणखी एका घोटाळ्याची पोलखोल करणार; भाजप आमदार मिहिर कोटेंचा इशारा
- पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे आंदोलन; भाडोत्री लोकांचा एक फ्लॉप शो !
- राज्यात संघर्ष, मात्र स्थानिक पातळीवर एकवटले; ‘या’ शहरात भाजपने केली शिवसेनेसोबत दोस्ती
- कोर्लईमध्ये भाजप- शिवसेनेत राडा; सोमय्या येताच गोमूत्र आणि दूध शिंपडून शुद्धीकरण