ठाणे : कल्याण डोंबिवलीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. मंत्री आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपच्या चार माजी नगरसेवक आणि काँग्रेसचे ज्येष्ठ माजी नगरसेवक रवी मट्या पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेल्या दोन महिन्यांत भाजपाच्या 6 विद्यमान आणि 2 माजी नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. भाजपसह इतर पक्षांचे अजून 17 नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या प्रवेशानंतर भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत फुटीरते मुळे सुरुंग लागला आहे.
शिवसेनेवर शोककुळा: जेष्ठ नेते सुधीर जोशी यांचे निधन, वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास
कल्याण-डोंबिवली पालिकेतील डोंबिवलीतील तुकाराम नगर प्रभागाचे माजी भाजप नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेविका रंजना नितीन पाटील आणि आयरे गावचे काँग्रेसचे माजी नगरसेवक रवी पाटील, भाजपाचे माजी नगरसेवक रणजित जोशी, माजी नगरसेविका वृषाली रणजित जोशी हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून शिवबंदन बांधले.
“विकासाच्या मुद्यावर राजकारण व्हावे, १५ वर्षे विरुद्ध ५ वर्षे असा सामना व्हावा”आमदार महेश लांडगे
याच वर्षात होऊ घातलेल्या कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवडणुकीत नवीन प्रभाग रचनेमध्ये भाजपच्या बहुतांशी प्रस्थापित नगरसेवकांचे प्रभागाची मोडतोड ते अन्य प्रभागांना जोडण्यात आले आहेत असे आरोप विरोधकांनी केलंय. त्यामुळे भाजप नगरसेवकांमध्ये, इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. येत्या पालिका निवडणुकीत आपणास उमेदवारी मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने भाजपमधील माजी नगरसेवक इच्छुकांनी शिवसेनेची वाट धरली आहे.
टीका करतात आणि कोकणात येऊन पडतात; उदय सामंतांचा नाव न घेता राणेंवर प्रहार
गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत डोंबिवलीत शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांची एकूण संख्या आता आठ झाली आहे. भाजपला गळती लागू नये त्यासाठी वरिष्ठांकडून बैठका घेत नसल्याने भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे. येणार काळात भाजपसह इतर पक्षांचे 17 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
Read also:
- शिवसेनेच्या आणखी एका घोटाळ्याची पोलखोल करणार; भाजप आमदार मिहिर कोटेंचा इशारा
- पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे आंदोलन; भाडोत्री लोकांचा एक फ्लॉप शो !
- राज्यात संघर्ष, मात्र स्थानिक पातळीवर एकवटले; ‘या’ शहरात भाजपने केली शिवसेनेसोबत दोस्ती
- कोर्लईमध्ये भाजप- शिवसेनेत राडा; सोमय्या येताच गोमूत्र आणि दूध शिंपडून शुद्धीकरण
- नारायण राणेंना मुंबई महापालिकेचा दणका; अनाधिकृत बांधकामप्रकरणी पालिकेची नोटीस