मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांना गेल्या काही दिवसांपासून अत्यवस्थ असल्याच जाणवत होतं. अखेर त्यांचं आज निधन झालं आहे. जोशी यांनी वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, सुधीर जोशी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. ते नुकतेच कोरोनाच्या आजारातून बरे होऊन घरी परतले होते.
चंद्रकांतदादांनी सोमय्यांच्या प्रकरणात पडू नये, अन्यथा त्यांचेही कपडे फाटतील – राऊत
शिवसेना पक्ष संघटनेत सुधीर जोशी यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. ते शिवसेनेचे मुंबईचे दुसरे महापौर होते. सुधीर जोशी यांनी मुंबईचे महापौर ते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्रीपद भूषवले होते. त्यांनी आजारपणामुळे 1999 मध्ये सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते फारसे सार्वजनिक जीवनातही दिसत नव्हते.
कुख्यात गुंड गजानन मारणेच्या पत्नीचा राष्ट्रवादीत प्रवेश; राजकीय वर्तुळात खळबळ
सुधीर जोशी हे 1968 साली प्रथम नगरसेवक झाले. मुंबई महानगरपालिका गटनेता, विरोधी पक्षनेता म्हणून ते राहिले. सुधीर जोशी हे 1973 मध्ये मुंबई महानगरपालिकेचे महापौर झाले तेव्हा ते सर्वांत तरुण महापौर होते. ते 1968 पासून विधान परिषद सदस्य होते. ते 1992-93 या दरम्यान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते. तेव्हा त्यांनी राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पाची पाहणी करुन त्यासंदर्भात अहवाल निष्कर्ष पुस्तिकेद्वारे शासनाकडे सादर केला. युतीच्या सरकारात ते जून 1995 ते मे 1996 या कालखंडात प्रथम महसूल मंत्री होते. नंतर 1996 ते 1999 पर्यंत शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत होते. मंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय लोकाभिमुख ठरले आहेत.
२५ हजार कोटींचा घोटाळा करणारा अमोल काळे लंडन’ला गेला का? काँग्रेसच्या सवालाने भाजपात खळबळ
संस्कृत व सुशिक्षित कार्यकर्त्यांचे मोहोळ लाभलेला’ आणि लोभस व्यक्तिमत्त्व असलेला, एकमेव शिवसेना नेता म्हणजे सुधीरभाऊ जोशी होय. मुंबईचे माजी महापौर तरुण व तडफदार सुधीर जोशी यांच्याकडे सुशिक्षित कार्यकर्त्यांची फौज असलेल्या स्थानीय लोकाधिकार समितीची धुरा बाळासाहेब ठाकरेंनी सोपविली, ती त्यांनी समर्थपणे सांभाळली. बाळासाहेबांनी त्यांच्यावरील टाकलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरविला होता. बाळासाहेबांच्या सहकारी नेत्यांतील एक विश्वासू सहकारी नेता म्हणून ते बाळासाहेबांचे जवळचे सहकारी राहिले आहेत.
Read also:
- महाराष्ट्रातील काँग्रेस नेते तुमचं ऐकत नाहीत का? राजू शेट्टींच राहूल गांधींना पत्र
- अब्रु नुकसानीच्या दाव्यांच्या हेलपाट्यांनीच तुम्ही मरणार – चंद्रकांत पाटील
- हिंदुस्थानी भाऊ’ला अखेर सशर्त जामीन मंजूर, काय आहे नेमकं प्रकरणं… वाचा सविस्तर…
- पुणे महापालिकेतील 6000 कोटींचा संशयास्पद व्यवहार; राष्ट्रवादीची एसीबीकडे तक्रार दाखल
- पुण्यात शिवसेना नेत्याच्या अडचणी वाढल्या; उपनेता कुचिक यांच्या विरोधात लैगिंक अत्याचाराचा गुन्हा