पुणे : पुण्यातील दौंड येथे राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीवर बलात्कार आणि तिचा गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बॉय का? म्हणूनच परवानगी मिळावी यासाठी सात फोन केले होते; मिलिंद नॉर्वेकरांचा राणेंना टोला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रघुनाथ कुचिक आणि पीडित तरुणी यांची ओळख ६ नोव्हेंबर २०२० पासून ते १० फेब्रुवारी २०२२ पर्यंत होती. त्या काळात सुरुवातीला ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. त्या तरुणीला आरोपी रघुनाथ कुचिक याने लग्नाचे आमिष दाखवून, शिवाजीनगर आणि अनेक ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केले. त्या दरम्यान ती तरुणी गरोदर राहिली.
भाजप नगरसेवकाने लावलेल्या अजित दादांच्या बॅनरची संबंध पुण्यात चर्चा
याबाबत आरोपीला माहिती मिळताच, पीडित तरुणीचा गर्भपात केला आणि याबद्दल तू कोणाला काही सांगितले तर तुला मारून टाकेन अशी धमकी दिली. हा घडलेला प्रकार पीडित तरुणीने पोलिसांना सांगताच आरोपी रघुनाथ बबन कुचिक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत.
Read also:
- २५ हजार कोटींचा घोटाळा करणारा अमोल काळे लंडन’ला गेला का? काँग्रेसच्या सवालाने भाजपात खळबळ
- कुख्यात गुंड गजानन मारणेच्या पत्नीचा राष्ट्रवादीत प्रवेश; राजकीय वर्तुळात खळबळ
- चंद्रकांतदादांनी सोमय्यांच्या प्रकरणात पडू नये, अन्यथा त्यांचेही कपडे फाटतील – राऊत
- फडणवीसच नव्हे, तर शहांच्या नावाने सोमय्यांनी खंडणी गोळा केली; संजय राऊतांचा पुन्हा गौप्यस्फोट
- सुशांतसिंह प्रकरणानंतर मला २ फोन मुख्यमंत्र्यांनी केलेत हे विसरू नका; राणेंचा नार्वेकरांना प्रत्यूत्तर