मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या आक्रमक पत्रकार परिषदेनंतर भारतीय जनता पक्ष चांगलाच खवळला आहे.भाजपच्या नेत्यांनीही पत्रकार परिषदा घेऊन शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील काल एक पत्रकार परिषद घेतली आणि संजय राऊत यांच्यावर अत्यंत शेलक्या भाषेत टीका केली. एवढंच नाही तर शिवसेना सचिव मिलिंद नॉर्वेकर यांना देखील ‘बॉय’ म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या इथं बॉय म्हणून काम करत होते संबोधल होतं.
तो मुलूंडचा दलाल, भडवा, त्याच्या बापाच राज्य आहे का? संजय राऊतांची सोमय्यांवर फटाकेबाजी
यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नॉर्वेकर यांनी लगेच ट्विट करून ‘बॉय’ म्ह्टल्यावरून राणेंना उत्तर दिले होते. मिलिंद नॉर्वेकर यांनी ट्विट करत म्हटलं होतं की याच बॉयला नारायण राणे यांनी त्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी मिळावी यासंदर्भात ७ वेळेस फोन केले होते. आता तुमच्या मेमरीची घंटी वाजली का ? असा सवालही नॉर्वेकर यांनी केला होता.
महाराष्ट्र गांXची औलाद नाही, तुमच्या नामर्दानगीला घाबरणार नाही; राऊतांची तोफ धडाडली
यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील अत्यंत तत्परतेने ट्विट करत उत्तर दिले आहे. नारायण राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की अभिनेते सुशांतसिंह राजपूत हत्येनंतर आपल्या फोनवरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा कॉल केला होता. हे आपण विसरला की काय ? अशा किती घटना मी आपणास सांगू ? असा प्रश्नही नारायण राणेंनी यावेळी विचारला आहे. एवढंच नाही तर मला यापुढे जास्त बोलायला लावू नका असं देखील ठणकावून सांगितलं आहे. आता शिवसेना सचिव मिलिंद नॉर्वेकर काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Read also:
- भाजप नगरसेवकाने लावलेल्या अजित दादांच्या बॅनरची संबंध पुण्यात चर्चा
- बॉय का? म्हणूनच परवानगी मिळावी यासाठी सात फोन केले होते; मिलिंद नॉर्वेकरांचा राणेंना टोला
- आम्ही संजय राऊतांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत
- जितेंद्र नवलानी कोण? हे नाव ऐकून ईडीच्या अधिकाऱ्यांनाही घाम फुटेल – राऊत
- ठाकरे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून ‘तारीख पे तारीख’, पण कुणाच्या भरवश्यावर; राऊत कडाडले