मुंबई : दिल्लीमध्ये भाजपचे लोक भेटले होते, त्यांनी सुद्धा मला सरकारमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. शिवसेनेच्या लोकांना ते टार्गेट करत आहे. त्यांना टाईट केले जात आहे. एकतर आम्ही काही आमदार फोडून सरकार पाडू किंवा राष्ट्रपती राजवट लागू करू, भाजपच्या नेत्यांकडून तारीख पे तारीख दिली जात आहे, पण कुणाच्या भरवश्यावर हेच कळत नाही, असा खळबळजनक खुलासा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला.
गोव्यात पहिल्यांदाच मतदानाचा विश्वविक्रम; भाजप उमेदवार जोशुओ डिसोझांनी मानले मतदारांचे आभार
उद्धव ठाकरेंनी काय खरं आहे ते लोकांसमोर मांडायला सांगितलं आहे. नंतर काय होईल ते बघून घेऊ. खरंतर ईडीच्या कार्यालयाबाहेर पत्रकार परिषद घ्यायची होती. पण सुरुवात इथे करु आणि अंत तिकडे करु. पाहू कोण राहतं ते. हा महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे. ही बाहरेची लोकं येऊन आमच्यावर दादागिरी करणार. आमच्या बायका-मुलींकडे बघणार, भाजपवाले टाळ्या वाजवणार हा निर्लज्जपणाचा कळस आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांच्या राज्यात असं काही घडलं नाही.
“सो सोनार की एक लोहार की” संजय राऊतांनी दिले ‘राजकीय’ युद्धाचे संकेत
“जो दलाल बोलतोय ना त्याला मराठीत भडवा म्हणतात. त्याने असं म्हटलं की ठाकरे कुटुंबाने थोरलाई गावात अलिबागजवळ 19 बंगले बांधून ठेवले आहेत. माझं आव्हान आहे त्या माणसाला, दलाला आव्हान आहे, कधीही सांगा, आपण चार बसेस करु आणि त्या 19 बंगल्यामध्ये पिकनिकला जाऊ. तुम्हाला जर ते बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन आणि दिसले नाही तर त्या दलालाला जोड्याने मारेन. आख्खी शिवसेना जोड्याने मारेन. दिशाभूल करायची. खोट्यापणा करायचा. कुठे आहेत 19 बंगले, चला पार्टी करु. लोकांच्या मनात भ्रम निर्माण करायचे.
नारायण राणेंच्या घराबाहेर काँग्रेसच आंदोलन; काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
मराठी माणसांचा द्वेष करायचा. महाराष्ट्राविषयी असूया, हाच किरीट सोमय्या ज्याने काही वर्षांपूर्वी हायकोर्टात अपील केलं होतं की, मुंबईतील शाळेत मराठी भाषेत सक्तीची असू नये. हा भाजपचा फ्रंटमॅन? आधी त्याचं थोबाडं बंद करा. पाटणकरांनी कर्जतला देवस्थानच्या जमिनी विकत घेतल्या. मी स्वत: माहिती घेतली. माझं त्यांना आव्हान आहे, पाटणकरांची जमीन कुठे आणि कशी विकत घेतली ते दाखवा. ही जमीन बाराव्या माणसाकडून खरेदी केलीय.”
Read also:
- महाराष्ट्र गांXची औलाद नाही, तुमच्या नामर्दानगीला घाबरणार नाही; राऊतांची तोफ धडाडली
- तो मुलूंडचा दलाल, भडवा, त्याच्या बापाच राज्य आहे का? संजय राऊतांची सोमय्यांवर फटाकेबाजी
- मोठी राजकीय उलथापालथ: राऊतांच्या पत्रकार परिषदेआधीच चंद्रकांत पाटील, सोमय्या दिल्लीकडे रवाना
- कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी सात दिवसात FIR दाखल करा, अन्यथा पोलिसांना कोर्टात खेचू – सोमय्या
- मोठी बातमी: चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी, ‘या’ तारखेला सुनावणार शिक्षा