मुंबई : कोव्हिड सेंटर घोटाळाप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवारी मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत ८९ पानांचे तक्रारपत्र सुपूर्द केले. पोलिसांनी आता यावरुन सात दिवसांत गुन्हा दाखल करावा. अन्यथा आम्ही आझाद मैदान पोलिसांना न्यायालयात खेचू, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला.
आधी टॉस होऊ द्या मग बॅटिंगचं पाहू; राऊतांच्या दाव्यावर आदित्य ठाकरेंचे सूचक वक्तव्य
यावेळी आझाद मैदान पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, आम्ही संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या आशीर्वादाने सुजीत पाटकर यांच्या बनावट कंपनीला कोव्हिड सेंटरचे कंत्राट देण्यात आले. सुजीत पाटकर यांच्या कंपनीला कंत्राट देऊन मुख्यमंत्र्यांनी कोव्हिड रुग्णांच्या जीवाशी खेळ करुन धंदा केला आहे. पुणे महानगरपालिकेने सुजीत पाटकर यांच्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केले होते. तरीही त्यांच्या कंपनीला १३ कंत्राटे देण्यात आली, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
शाखो से टूट जाएँ वो पत्ते नहीं हैं हम… संजय राऊतांच्या ट्विट ने राजकीय गोटात खळबळ
सुजीत पाटकर यांच्या कंपनीने कोव्हिड सेंटरचे कंत्राट मिळवण्यासाठी दाखल केलेली कागदपत्रे बनावट होती. अनेक कोव्हिड सेंटरमध्ये डॉक्टर्स आणि नर्सेस नव्हत्या. बीएएमएस डॉक्टर्सला एमडी म्हणून दाखवण्यात आले. ही कागदपत्रं खोटी असतील तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. अन्यथा सुजीत पाटकर यांच्या कंपनीवर आणि त्यांना कंत्राट देणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली. मी गेल्या १५ दिवसांपासून ही कागदपत्रे दाखवत आहे. मग अजूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या पार्टनरला अटक का केली नाही, असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला.
Thackeray Sarkar's COVID Centre Scam. Kirit Somaiya filed Complaint at Azad Maidan Police Station against Lifeline Hospital Management Services & BMC & Maharashtra Govt.
ठाकरे सरकारच्या कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या यांची आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल pic.twitter.com/XN0Nz1s07v
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 15, 2022
यावेळी किरीट सोमय्या यांनी माझी पत्नी मेधा आणि मुलगा नील सोमय्या यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. संजय राऊत यांनी मला खुशाल बर्बाद करावं, पण रुग्णांच्या जीवाशी खेळ करु नये. माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी फरक पडत नाही, असेही सोमय्या यांनी म्हटले.
Read also:
- मोठी बातमी: चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी, ‘या’ तारखेला सुनावणार शिक्षा
- नारायण राणेंच्या घराबाहेर काँग्रेसच आंदोलन; काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
- “सो सोनार की एक लोहार की” संजय राऊतांनी दिले ‘राजकीय’ युद्धाचे संकेत
- गोव्यात पहिल्यांदाच मतदानाचा विश्वविक्रम; भाजप उमेदवार जोशुओ डिसोझांनी मानले मतदारांचे आभार
- मी फरार नाही, दिल्लीत आहे, पोलिस बोलावतील तेव्हा यायला तयार; आमदार रवी राणांचे स्पष्टीकरण