मुंबई : आगामी काळात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात संघर्ष वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. गेल्या २५ वर्षांपासून महाराष्ट्रात भाऊ-भाऊ म्हणून राहत असणारे हे भाऊ आता एकमेकांच्या विरोधात ठाकले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल सकाळी एका पत्रकारपरिषदेत खळबळजनक खुलासे करण्याचे आव्हान सर्वांना दिले आहे.
चर्चा तर होणारच.! राज ठाकरेंच्या नावापुढे चक्क हिंदुह्रदयसम्राच, घाटकोपरमध्ये भलमोठं बॅनर
गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि इतर नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. ईडीकडून काही नेत्यांच्या चौकशी सुरु आहे, धाडी टाकल्या जात आहेत. शिवसेनेचा संयम आता तुटला आहे आणि आता भाजपाला याची फळं भोगावी लागणार असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता. आज सकाळीच पुन्हा एकदा संजय राऊत यांनी आज करत असणाऱ्या धमाक्याचे संकेत दिले आहेत. आज साक्लीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे जे कमालीचं व्हायरल होत आहे.
शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश जारी; काय आहेत नियम… वाचा सविस्तर…
” शाख़ों से टूट जाएँ वो पत्ते नहीं हैं हम आँधी से कोई कह दे कि औक़ात में रहे ” अशा आशयाचं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. यासोबतच त्यांनी आपला एक फोटो देखील शेअर केला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या आव्हानानंतर आज महाराष्ट्रातील शिवसेनेचे मुख्य पदाधिकारी मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज संजय राऊत शिवसेनेतर्फे जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत. आज आता संजय राऊत काय काय गौफ्यस्फोट करणार याकडे संबंध महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Read also:
- आधी टॉस होऊ द्या मग बॅटिंगचं पाहू; राऊतांच्या दाव्यावर आदित्य ठाकरेंचे सूचक वक्तव्य
- लढा एसटी विलिनीकरणाचा; कर्मचाऱ्यांचे कुटूंबीय म्हणतात… सरकारला कोल्हापूरी हिसका दाखवू…
- “महाराष्ट्रात दोन शिवजयंती नको”; शिवसेना आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- शिवसेना-भाजपची पुन्हा युती; ‘या’ नगरपंचायतीमध्ये काँग्रेसला शिकवला धडा
- पुण्यातील लोकांना माहित आहे… अजित पवारांचे नाव न घेता चंद्रकांत पाटलांनी हाणला उपरोधिक टोला