मुंबई : आगामी काळात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात संघर्ष वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. गेल्या २५ वर्षांपासून महाराष्ट्रात भाऊ-भाऊ म्हणून राहत असणारे हे भाऊ आता एकमेकांच्या विरोधात ठाकले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल सकाळी एका पत्रकारपरिषदेत खळबळजनक खुलासे करण्याचे आव्हान सर्वांना दिले आहे.
तोंड दाबलेलं, हात पकडलेले; अशा अवस्थेत अतुल लोंढे पोलिसांच्या ताब्यात
गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि इतर नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. ईडीकडून काही नेत्यांच्या चौकशी सुरु आहे, धाडी टाकल्या जात आहेत. यावर आता शिवसेनेचा संयम तुटला आहे आणि आता आम्ही तुम्हाला बरबाद करून टाकणार असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
संभाजीराजेंचा पुन्हा एल्गार; ‘या’ तारखेपासून करणार आमरण उपोषण
संजय राऊत हे नेहमीच आक्रमपणे भूमिका घेत असतात. आज मुंबईमध्ये शिवसेना भवन येथे शिवसेनेकडून एका मोठ्या पत्रकार परिषदेचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार हे देखील उपस्थित असणार आहेत.
चर्चा तर होणारच.! राज ठाकरेंच्या नावापुढे चक्क हिंदुह्रदयसम्राच, घाटकोपरमध्ये भलमोठं बॅनर
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी यांनी देखील संजय राऊत घेणार असलेल्या पत्रकार परिषदेबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. आधी टॉस होऊ द्या मग बॅटिंग काय करायची ते पाहू’ असं आदित्य ठाकरे म्हटल्याने आता राजकीय गोटात खळबळ माजली आहे. आदित्य ठाकरे हे नेहमीच सामंज्यस्याची भूमिका घेत असतात. मात्र यावेळी आदित्य ठाकरे यांनी देखील सूचक प्रतिक्रिया दिल्याने शिवसेना करणाऱ्या खुलास्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Read also:
- लढा एसटी विलिनीकरणाचा; कर्मचाऱ्यांचे कुटूंबीय म्हणतात… सरकारला कोल्हापूरी हिसका दाखवू…
- “महाराष्ट्रात दोन शिवजयंती नको”; शिवसेना आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- शिवसेना-भाजपची पुन्हा युती; ‘या’ नगरपंचायतीमध्ये काँग्रेसला शिकवला धडा
- पुण्यातील लोकांना माहित आहे… अजित पवारांचे नाव न घेता चंद्रकांत पाटलांनी हाणला उपरोधिक टोला
- शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश जारी; काय आहेत नियम… वाचा सविस्तर…