अमरावती : अमरावती मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेकीचे प्रकरण मागील काही काळात चांगलेच गाजले होते. या प्रकरणी आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ते आता अडचणीत आले आहेत. रवी राणा यांच्यासह त्यांच्या 11 कार्यकर्त्यांविरुद्ध आयुक्तांवर प्राणघातक हल्ल्यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश जारी; काय आहेत नियम… वाचा सविस्तर…
गुन्हा दाखल झाल्यापासून आमदार रवी राणा हे फरार झाले आहेत. आमदार रवी राणा हे सध्या दिल्लीत आहेत. ते अमरावतीत न सापडल्याने त्यांना अटक करण्यासाठी पोलीस पथक राजधानी दिल्लीला रवाना झाले आहे. या प्रकरणात अमरावती पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. दरम्यान त्यांनी रवी राणा यांनी एका वृत्तवाहिनीला एक व्हिडीओ पाठवला. त्यात त्यांनी ते स्वतः अटक करुन घेण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे.
पुण्यातील लोकांना माहित आहे… अजित पवारांचे नाव न घेता चंद्रकांत पाटलांनी हाणला उपरोधिक टोला
त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की ‘मी काही फरार झालेलो नाही. अमरावती पोलीस बोलावतील तेव्हा मी अमरावतीत यायला तयार आहे. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांना माझी अटकच हवी असेल, तर त्यांनी पोलिसांना दिल्लीला पाठवावे, मी अटक करवून घ्यायला तयार आहे, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला.
शिवसेना-भाजपची पुन्हा युती; ‘या’ नगरपंचायतीमध्ये काँग्रेसला शिकवला धडा
आजही मी दिल्लीतच आहे आणि फरार नाही असं देखील रवी राणा यांनी म्हटलं आहे. माझ्यावर कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर मी लगेचच दिल्लीत पत्रकार परिषद घेतली होती. मी निर्दोष आहे आणि आजही दिल्ली येथे झालेल्या रेल्वेच्या बैठकीत सहभागी झालो. त्यामुळे पोलीस जेव्हा बोलावतील, तेव्हा मी अमरावतीत यायला तयार असल्याचे राणा यांनी व्हिडीओद्वारे म्हटले आहे.
Read also:
- गोव्यात तब्बल ७८.९४ टक्के मतदान; कोणाचा झेंडा फडकणार? धक्कादायक निकालाची शक्यता
- शाखो से टूट जाएँ वो पत्ते नहीं हैं हम… संजय राऊतांच्या ट्विट ने राजकीय गोटात खळबळ
- आधी टॉस होऊ द्या मग बॅटिंगचं पाहू; राऊतांच्या दाव्यावर आदित्य ठाकरेंचे सूचक वक्तव्य
- लढा एसटी विलिनीकरणाचा; कर्मचाऱ्यांचे कुटूंबीय म्हणतात… सरकारला कोल्हापूरी हिसका दाखवू…
- “महाराष्ट्रात दोन शिवजयंती नको”; शिवसेना आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी