मुंबई : आगामी काळात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात संघर्ष वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. गेल्या २५ वर्षांपासून महाराष्ट्रात भाऊ-भाऊ म्हणून राहत असणारे हे भाऊ आता एकमेकांच्या विरोधात ठाकले आहे. संजय राऊत यांनी पुढे येऊन भाजपच्या विरोधात दंड थोपटल्याने आता राजकीय युद्ध पेटण्याची शक्यता आहे.
“महाराष्ट्रात दोन शिवजयंती नको”; शिवसेना आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासहित शिवसेनेच्या मुख्य नेत्यांवर मागील काही काळापासून ईडीची कारवाई सुरु आहे आणि त्याविरोधात आता शिवसेनेकडून शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे ज्याचे नेतृत्व संजय राऊत करणार आहेत. त्याआधी संजय राऊत यांनी सकाळी पत्रकारांशी सवांद साधला आहे. सो सोनार की एक लोहार की, असे म्हणत, संजय राऊतांनी आता शड्डूच ठोकला आहे. त्याचवेळी त्यांनी गुजरातमध्ये उघडकीस आलेल्या देशातील सर्वात मोठ्या घोटाळ्यावरही भाष्य करत तपास यंत्रणांवर ताशेरे ओढले आहे.
लढा एसटी विलिनीकरणाचा; कर्मचाऱ्यांचे कुटूंबीय म्हणतात… सरकारला कोल्हापूरी हिसका दाखवू…
गुजरातमध्ये नुकताच सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. हा घोटाळा २०१७ सालापासून सुरु आहे. आता इडी आणि इतर तपास यंत्रणांनी तिथेही जाऊन तपास करावा, त्यातील आरोपी कोण आहेत, त्यामागील सुत्रधार कोण आहेत, याचा तपास करावा. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी तपास यंत्रणा काम करत असतील तर त्यांना सर्व सहकार्य करणार. पण देशातला सर्वात मोठा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न झाला आहे असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आता संजय राऊत या पत्रकार परिषदेत ते कोणाकोणाची नावे घेतात, याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Read also:
- गोव्यात पहिल्यांदाच मतदानाचा विश्वविक्रम; भाजप उमेदवार जोशुओ डिसोझांनी मानले मतदारांचे आभार
- मी फरार नाही, दिल्लीत आहे, पोलिस बोलावतील तेव्हा यायला तयार; आमदार रवी राणांचे स्पष्टीकरण
- गोव्यात तब्बल ७८.९४ टक्के मतदान; कोणाचा झेंडा फडकणार? धक्कादायक निकालाची शक्यता
- शाखो से टूट जाएँ वो पत्ते नहीं हैं हम… संजय राऊतांच्या ट्विट ने राजकीय गोटात खळबळ
- आधी टॉस होऊ द्या मग बॅटिंगचं पाहू; राऊतांच्या दाव्यावर आदित्य ठाकरेंचे सूचक वक्तव्य