मुंबई : राज्यातलं सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. आधी आमच्या नेत्यांना लक्ष्य केलं. नंतर माझ्याकडे वळले. पण यंत्रणांना भीक घातली नाही म्हणून ईडीच्या धाडी सुरू झाल्या. काय बघायचं ते बघून घ्या. आम्हीदेखील बघून घेऊ, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला थेट आव्हान दिलं आहे.
गोव्यात पहिल्यांदाच मतदानाचा विश्वविक्रम; भाजप उमेदवार जोशुओ डिसोझांनी मानले मतदारांचे आभार
ईडीच्या धाडींची माहिती मुलुंडमधल्या दलालाला सर्वात आधी कशी काय मिळते, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. ठाकरे कुटुंबानं अलिबागमध्ये कोरलाईत १९ बंगले बांधले आहेत. ती बेनामी संपत्ती असल्याचा दावा मुलुंडमधल्या दलालानं केला आहे. कुठे आहेत १९ बंगले? चला आपण त्या बंगल्यात आपण पिकनिकला जाऊ, असं आव्हान राऊतांनी दिलं.
“सो सोनार की एक लोहार की” संजय राऊतांनी दिले ‘राजकीय’ युद्धाचे संकेत
मुंबई: महाराष्ट्र आणि मराठी माणसाविरोधात जे आक्रमण सुरू आहे. त्याविरोधात कोणी तरी रणशिंग फुंकायला हवं होतं. ते शिवसेना भवनातून आम्ही फुंकत आहोत. तू काही पाप केलं नसेल, काही गुन्हा केला नसेतल तर कुणाच्या बापाला घाबरू नको, असं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सागंत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही त्याच पद्धतीने शिवसेना पुढे नेत आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र हा गांडूची औलाद नाही. मराठी माणूस बेईमान नाही. तुम्ही कितीही नामर्दानगी करून वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही, हा संदेश देण्यासाठीच ही पत्रकार परिषद आहे, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी दिला. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना असेल, ठाकरे परिवार असेल, अडसूळ असतील, वायकर असतील, परब आणि भावना गवळी यांच्यासह पवार कुटुंबीयांवर तपास यंत्रणांनी हल्ले केले आहेत, असं राऊत म्हणाले.
Read also:
- तो मुलूंडचा दलाल, भडवा, त्याच्या बापाच राज्य आहे का? संजय राऊतांची सोमय्यांवर फटाकेबाजी
- मोठी राजकीय उलथापालथ: राऊतांच्या पत्रकार परिषदेआधीच चंद्रकांत पाटील, सोमय्या दिल्लीकडे रवाना
- कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी सात दिवसात FIR दाखल करा, अन्यथा पोलिसांना कोर्टात खेचू – सोमय्या
- मोठी बातमी: चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी, ‘या’ तारखेला सुनावणार शिक्षा
- नारायण राणेंच्या घराबाहेर काँग्रेसच आंदोलन; काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड