मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा धमाका करणार असल्याचं जाहीर केल्यानंतर प्रचंड राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेषत: राऊत यांच्या पत्रकार परिषदेला अवघे दोन तास बाकी असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. तर भाजपचे नेते किरीट सोमय्या हे थोड्याच वेळात दिल्लीसाठी रवाना होणार आहेत.
आधी टॉस होऊ द्या मग बॅटिंगचं पाहू; राऊतांच्या दाव्यावर आदित्य ठाकरेंचे सूचक वक्तव्य
भाजपच्या साडेतीन लोकांची नावे जाहीर करणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं. पण या नेत्यांची कोणत्या संदर्भात पोलखोल करणार हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवलं. पण संजय राऊत यांच्या गर्भित इशाऱ्यानंतर भाजपच्या तंबूत चांगलीच खळबळ उडालेली दिसत आहे. संजय राऊत हे दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबादमधूनही शिवसेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी शिवसेना भवना समोर दाखल झाले आहेत.
शाखो से टूट जाएँ वो पत्ते नहीं हैं हम… संजय राऊतांच्या ट्विट ने राजकीय गोटात खळबळ
बर्दाश्त बहोत किया अब बर्बाद करेंगे असं राऊतांनी सुनावलं होतं. त्यामुळे राऊत यांच्या पीसीपूर्वीच भाजपच्या तंबूत खळबळ उडाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊत काय बोलणार मला माहीत नाही. त्यांच्या मनातील मला ओळखता येत नाही, असं म्हटलं होतं. तेच पाटील आज दुपारी 2 वाजून 2 मिनिटांनी अचानक दिल्लीला रवाना झाले. तर मला अटक करून दाखवा, मी बसलेलोच आहे. माझी बॅग भरलेलीच आहे. मी कुणाला घाबरत नाही, असं पुण्यातील पत्रकार परिषदेत जाहीरपणे सांगणारे किरीट सोमय्याही सायंकाळी 5 वाजता दिल्लीला रवाना होणार आहेत. त्यामुळे दोन्ही नेते अचानक दिल्लीत गेल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
मी फरार नाही, दिल्लीत आहे, पोलिस बोलावतील तेव्हा यायला तयार; आमदार रवी राणांचे स्पष्टीकरण
दिल्ली भेटीत चंद्रकांत पाटील आणि सोमय्या हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच राऊत यांनी राज्यातील किंवा केंद्रातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यास पुढे काय करायचं याचं मार्गदर्शन हे दोन्ही नेते दिल्लीतील नेत्यांकडून घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पाटील आणि सोमय्या यांच्या या दिल्लीवारीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे.
Read also:
- कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी सात दिवसात FIR दाखल करा, अन्यथा पोलिसांना कोर्टात खेचू – सोमय्या
- मोठी बातमी: चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी, ‘या’ तारखेला सुनावणार शिक्षा
- नारायण राणेंच्या घराबाहेर काँग्रेसच आंदोलन; काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
- “सो सोनार की एक लोहार की” संजय राऊतांनी दिले ‘राजकीय’ युद्धाचे संकेत
- गोव्यात पहिल्यांदाच मतदानाचा विश्वविक्रम; भाजप उमेदवार जोशुओ डिसोझांनी मानले मतदारांचे आभार