मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या आक्रमक पत्रकार परिषदेनंतर भारतीय जनता पक्ष चांगलाच खवळला आहे. ईडीकडून सातत्याने शिवसेना नेत्यांना टार्गेट केल्याने संजय राउत यांनी केंद्रीय तपस यंत्रणा आणि भाजपवर टीकेची झोड उठवली आणि काही खळबळजनक दावे देखील केले आहेत.
मोठी बातमी: चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी, ‘या’ तारखेला सुनावणार शिक्षा
आता भाजपच्या नेत्यांनीही पत्रकार परिषदा घेऊन शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील काल एक पत्रकार परिषद घेतली आणि संजय राऊत यांच्यावर अत्यंत शेलक्या भाषेत टीका केली. एवढंच नाही तर शिवसेना सचिव मिलिंद नॉर्वेकर यांना देखील ‘बॉय’ म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या इथं बॉय म्हणून काम करत होते संबोधलं.
कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी सात दिवसात FIR दाखल करा, अन्यथा पोलिसांना कोर्टात खेचू – सोमय्या
यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी देखील नारायण राणे यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. बॉय का? अच्छा. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचे विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?” असं म्हणत नारायण राणे यांना जोरदार टोला हाणला आहे.
मोठी राजकीय उलथापालथ: राऊतांच्या पत्रकार परिषदेआधीच चंद्रकांत पाटील, सोमय्या दिल्लीकडे रवाना
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या परवानगीसाठी राणे तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलले होते. त्यानंतरच राणे यांचे महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग खुला झाला. त्या वेळी राणे यांना उद्धव ठाकरे यांचे स्वीयसहाय्य्क आणि सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याशीच संपर्क साधावा लागला होता. त्यासाठी राणेंनी दिवसभरात सात वेळा फोन करून नार्वेकरांशी बोलणे केले होते. या साऱ्या प्रसंगाची आठवण नार्वेकर यांनी या वेळी करून दिली आहे.
Read also:
- आम्ही संजय राऊतांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत
- जितेंद्र नवलानी कोण? हे नाव ऐकून ईडीच्या अधिकाऱ्यांनाही घाम फुटेल – राऊत
- ठाकरे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून ‘तारीख पे तारीख’, पण कुणाच्या भरवश्यावर; राऊत कडाडले
- महाराष्ट्र गांXची औलाद नाही, तुमच्या नामर्दानगीला घाबरणार नाही; राऊतांची तोफ धडाडली
- तो मुलूंडचा दलाल, भडवा, त्याच्या बापाच राज्य आहे का? संजय राऊतांची सोमय्यांवर फटाकेबाजी