पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शांततेत सुरु असणार राजकारण हे आता पेट घेताना दिसत आहे. महाविकास आघाडी त्यातही मुख्यत्वे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी लढाई पुण्यात दिसणार आहे. फोडाफोडीच्या राजकारणालाही आताच सुरुवात झालेली आहे.
मोठी बातमी: चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी, ‘या’ तारखेला सुनावणार शिक्षा
मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी फोडाडीची घोषणा केली होती. काल परवा रुपाली पाटील आणि प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीमध्ये गजानन मारणे यांच्या पत्नी नगरसेविका मारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आता पुण्यात भाजप नगरसेवकाने लावलेल्या बॅनरची देखील कमालीची चर्चा होताना दिसत आहे.
कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी सात दिवसात FIR दाखल करा, अन्यथा पोलिसांना कोर्टात खेचू – सोमय्या
पिंपरीचिंचवडमधील भाजपचे विद्यमान नगरसेवक तुषार कामठे यांनी महापालिकेसमोरील चौकासह शहरात मोक्याच्या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाचे वीस भलेमोठे होर्डिंग्ज लावल्याने शहरभर त्याची चर्चा सुरु आहे. पालिकेतील भ्रष्ट्राचाराविरोधात त्यांनी सभागृहात आणि बाहेरही आवाज उठविलेला आहे.
मोठी राजकीय उलथापालथ: राऊतांच्या पत्रकार परिषदेआधीच चंद्रकांत पाटील, सोमय्या दिल्लीकडे रवाना
अशाच एका प्रकरणात त्यांनी ५५ कोटींच्या झालेल्या अपहाराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे तक्रार केली होती. त्याची त्यांनी दखल, तर घेतलीच. शिवाय त्यात पोलिसांनी गुन्हाही दाखल केल्याने कामठे यांनी दादांचे जाहीर अभिनंदन त्यांचे फ्लेक्स लावून केले आहे.
तो मुलूंडचा दलाल, भडवा, त्याच्या बापाच राज्य आहे का? संजय राऊतांची सोमय्यांवर फटाकेबाजी
अजित दादा, तुमचे खूप आभार. आपण दाखवून दिले जे चुकीचे आहे, ते चुकीचेच आहे. भ्रष्टाचार नष्ट झालाच पाहिजे, मग भ्रष्टाचारी कोणी का असेना. तुम्ही घेतलेल्या निर्णयामुळे घोटाळेबाज कंत्राटदार व त्याच्या कंपनीवर गुन्हा, तर दाखल झालाच. शिवाय, करदात्यांचे ५५ कोटी रुपयेही वाचविलेत“ अशा आशयाचा मजकूर या फ्लेक्सवर लावण्यात आला आहे. आता कामठे देखील राष्ट्रवादीत जातात की काय ? अशी देखील चर्चा सुरु झाली आहे.
Read also:
- बॉय का? म्हणूनच परवानगी मिळावी यासाठी सात फोन केले होते; मिलिंद नॉर्वेकरांचा राणेंना टोला
- आम्ही संजय राऊतांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत
- जितेंद्र नवलानी कोण? हे नाव ऐकून ईडीच्या अधिकाऱ्यांनाही घाम फुटेल – राऊत
- ठाकरे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून ‘तारीख पे तारीख’, पण कुणाच्या भरवश्यावर; राऊत कडाडले
- महाराष्ट्र गांXची औलाद नाही, तुमच्या नामर्दानगीला घाबरणार नाही; राऊतांची तोफ धडाडली