मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या आक्रमक पत्रकार परिषदेनंतर भारतीय जनता पक्ष चांगलाच खवळला आहे. भाजपच्या नेत्यांनीही पत्रकार परिषदा घेऊन शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला आहे. संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मोहित भारतीय, किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
आधी टॉस होऊ द्या मग बॅटिंगचं पाहू; राऊतांच्या दाव्यावर आदित्य ठाकरेंचे सूचक वक्तव्य
संजय राऊत यांच्या बाजूनेही आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मैदानात उतरले आहेत. काँग्रेस पक्षाने आता एक सवाल उपस्थित केला आहे ज्याचे उत्तर भाजपला देणे कठीण जाणार आहे. संजय राऊतांची पत्रकार परिषद जेव्हा संपत होती तेव्हा त्यांनी एका घोटाळेबाज व्यक्तीचे नाव घेतले होते जो भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात होता.
जितेंद्र नवलानी कोण? हे नाव ऐकून ईडीच्या अधिकाऱ्यांनाही घाम फुटेल – राऊत
अमोल काळे कुठं आहे असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी विचारला होता. यावर आता काँग्रेसनेही काही माहिती समोर आणली आहे. संजय राऊत साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन उघड केलेल्या घोटाळ्यातील एक घोटाळेबाज लंडनला पळून गेल्याची माहिती मिळतेय. तो घोटाळेबाज अमोल काळे तर नाही ना ? कुठे आहे अमोल काळे? असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारला आहे.
बॉय का? म्हणूनच परवानगी मिळावी यासाठी सात फोन केले होते; मिलिंद नॉर्वेकरांचा राणेंना टोला
राज्यात भाजपचे सरकार असताना सरकारने महाआयटीमध्ये २५ हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप राऊतांनी केला आहे. राऊत यांनी अमोल काळे आणि विजय ढवंगाळे यांची नावे घेतली आहेत. यांच्या बँक खात्यातून पैसे कुठे कुठे गेले, विना टेंडर कोणाला कंत्राट दिले गेले, हा पैसा कुठे कुठे गेले याची तक्रार आपण करणार असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले होते.
Read also:
- कुख्यात गुंड गजानन मारणेच्या पत्नीचा राष्ट्रवादीत प्रवेश; राजकीय वर्तुळात खळबळ
- चंद्रकांतदादांनी सोमय्यांच्या प्रकरणात पडू नये, अन्यथा त्यांचेही कपडे फाटतील – राऊत
- फडणवीसच नव्हे, तर शहांच्या नावाने सोमय्यांनी खंडणी गोळा केली; संजय राऊतांचा पुन्हा गौप्यस्फोट
- सुशांतसिंह प्रकरणानंतर मला २ फोन मुख्यमंत्र्यांनी केलेत हे विसरू नका; राणेंचा नार्वेकरांना प्रत्यूत्तर
- भाजप नगरसेवकाने लावलेल्या अजित दादांच्या बॅनरची संबंध पुण्यात चर्चा