पुणे : नुकताच गुजरात दौरा झालेला नदीसुधार प्रकल्प, पीपीपीचे रस्ते, वैद्यकीय महाविद्यालय, २४ बाय ७ चा पाणीपुरवठा प्रकल्प, बाणेर-वारजे’चे १००० कोटीचे हॉस्पिटल, वडगाव शेरी येथील अॅमिनीटी स्पेसच्या जागेवर एका बांधकाम व्यावसायीकाला शाळा बांधण्याची परवानगी देण्याचा ठराव, अशा विविध सुमारे ६ हजार कोटी रुपयांच्या कामांची, प्रस्तावांच्या प्रवासाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे. या प्रकरणी त्यांनी एसीबीकडे आज तक्रार दाखल केली आहे.
बॉय का? म्हणूनच परवानगी मिळावी यासाठी सात फोन केले होते; मिलिंद नॉर्वेकरांचा राणेंना टोला
जगताप म्हणाले, भाजपच्या ज्या ३-४ लोकांच्या वर्तुळात सत्ता फिरत राहिली ती आपल्या पुढच्या १० पिढ्यांच्या कल्याणाचा धंदा करत आली. महापालिकेची ऐपत नसताना उधारीने सत्ताधाऱ्यांनी पैसे घेतले. त्यामुळे पुढील ५ वर्षे महापालिकेला पैसे फेडत बसावे लागेल, अशा पद्धतीची ठेके लादून पुण्याला खड्ड्यात घालणारा कारभार केला आहे. या सर्वांची चौकशी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी केली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.
भाजप नगरसेवकाने लावलेल्या अजित दादांच्या बॅनरची संबंध पुण्यात चर्चा
पुढे बोलताना ते म्हणाले, सत्ताधारी भाजपने एवढी उलाढाल केली की, पुढील ५ वर्षे कोणाचीही सत्ता आली तरी त्यांना मागचेच हप्ते देत बसावे लागेल. अशा पद्धतीचा कारभार करून या ३-४ जनांनी आपापल्या पुढील पिढ्यांची सोय करून ठेवली आहे. आणि काही प्रमाणात आता निवडणुकीला फंडिंग व्हावे, यादृष्टीने देखील ठराव आणले जात आहे. अॅमिनिटी स्पेसची विक्री, रुग्णालये उभारताना काहींशी करून ठेवलेली पार्टनरशिप, महापालिकेची जागा, कर्ज हि महापालिकेवर आणि प्रत्यक्षात मालकी, कमाई दुसऱ्याच्या कक्षेतील या सर्व आक्षेपार्ह बाबींचा आणि हजार कोटीच्या हॉस्पिटलच्या प्रस्तावाचा प्रवास तपासून पाहावा, असे आमचे म्हणणे आहे, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
स्थायी समितीमध्ये नदी सुधार व पीपीपीतून रस्ते विकसित करण्याचे प्रस्ताव येणार होते, पण सत्ताधारी व प्रशासन यांच्यामध्ये वाद असल्याने हे प्रस्ताव आज आले नाहीत असा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला. तसेच महापालिकेत चुकीच्या पद्धतीने निविदा काढणे, नियम बदलणे, शाळेसाठी जागा देणे यातून मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार केला जात आहे. त्यामुळे अशा सर्व प्रकरणांची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सादर केले जाणार आहे. भाजपचे काही पदाधिकारी चुकीचे प्रस्ताव मान्य करून पुढच्या पिढ्यांची व्यवस्था लावत आहेत, असा आरोप जगताप यांनी केला.
Read also:
- पुण्यात शिवसेना नेत्याच्या अडचणी वाढल्या; उपनेता कुचिक यांच्या विरोधात लैगिंक अत्याचाराचा गुन्हा
- २५ हजार कोटींचा घोटाळा करणारा अमोल काळे लंडन’ला गेला का? काँग्रेसच्या सवालाने भाजपात खळबळ
- कुख्यात गुंड गजानन मारणेच्या पत्नीचा राष्ट्रवादीत प्रवेश; राजकीय वर्तुळात खळबळ
- चंद्रकांतदादांनी सोमय्यांच्या प्रकरणात पडू नये, अन्यथा त्यांचेही कपडे फाटतील – राऊत
- फडणवीसच नव्हे, तर शहांच्या नावाने सोमय्यांनी खंडणी गोळा केली; संजय राऊतांचा पुन्हा गौप्यस्फोट