मुंबई : विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून चिथावणी दिल्याचा आरोपाखाली युट्युबर विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊला अटक करण्यात आली होती. आज अखेर हिंदुस्थानी भाऊला जामीन मंजूर झाला आहे. सेशन्स न्यायालयाकडून त्याला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याच्या निर्णयाला विरोध करत, मुंबईतील धारावीसह राज्यभरात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्यात आले होते. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली धारावी पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊला अटक केली होती.
Mumbai sessions court grants bail to Vikas Fhatak alias Hindustani Bhau in the matter of Dharavi Students Protest over online exams. He was arrested on February 1st by Dharavi Police station: Advocate Aniket Nikam, representing Hindustani Bhau
(File photo) pic.twitter.com/n8bDRh8mMr
— ANI (@ANI) February 17, 2022
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा ऑफलाइन घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यासाठी विद्यार्थ्यांना भडकवले आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी धारावीत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानाजवळ आंदोलन केले, अशा आरोपाखाली हिंदुस्थानी भाऊविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली होती. ३० हजार रुपयांची वैयक्तिक हमी आणि तितक्याच रकमेसह एक किंवा दोन हमीदार देण्याच्या अटीवर सेशन्स कोर्टाने भाऊला जामीन मंजूर केला आहे.
Read also:
- पुणे महापालिकेतील 6000 कोटींचा संशयास्पद व्यवहार; राष्ट्रवादीची एसीबीकडे तक्रार दाखल
- पुण्यात शिवसेना नेत्याच्या अडचणी वाढल्या; उपनेता कुचिक यांच्या विरोधात लैगिंक अत्याचाराचा गुन्हा
- २५ हजार कोटींचा घोटाळा करणारा अमोल काळे लंडन’ला गेला का? काँग्रेसच्या सवालाने भाजपात खळबळ
- कुख्यात गुंड गजानन मारणेच्या पत्नीचा राष्ट्रवादीत प्रवेश; राजकीय वर्तुळात खळबळ
- चंद्रकांतदादांनी सोमय्यांच्या प्रकरणात पडू नये, अन्यथा त्यांचेही कपडे फाटतील – राऊत