जळगाव : राज्यात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत राजकीय वातावरण चांगलचं गरम केलं आहे. मात्र अशातच बोदवड नगरपंचायत निवडणुकीत १७ पैकी ९ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने बोदवड नगरपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवली होती. शुक्रवारी या नगरपंचायतीसाठी नगराध्यक्षपदाची निवडप्रक्रिया पार पडली. यात नगराध्यक्षपदाची माळ आनंद रामदास पाटील यांच्या गळ्यात तर उपनगराध्यक्षपदी रेखा संजय गायकवाड यांची निवड झाली आहे. दरम्यान नगराध्यक्ष निवडीच्या वेळी भाजपच्या नगरसेवकाने शिवसेनेला साथ दिली आहे. तसंच मुक्ताईनगर मतदारसंघातील शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनीही भविष्यातील वेगळ्या राजकीय समीकरणांचे संकेत दिले आहेत.
अब्रु नुकसानीच्या दाव्यांच्या हेलपाट्यांनीच तुम्ही मरणार – चंद्रकांत पाटील
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे, भाजपचे गिरीश महाजन, शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे लागलं होतं. अंत्यत चुरशीच्या झालेल्या बोदवड नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला धूळ चारत शिवसेनेनं नगरपंचायतीवर भगवा फडकावला आहे. या निवडणुकीत शिवसेनेने १७ पैकी ९ जागांवर विजय मिळवला आहे, तर ईश्वरचिठ्ठीने एक जागा भाजपला मिळाली होती. तसंच राष्ट्रवादीला ७ जागांवर विजय मिळवण्यात यश आलं होतं.
महाराष्ट्रातील काँग्रेस नेते तुमचं ऐकत नाहीत का? राजू शेट्टींच राहूल गांधींना पत्र
बोदवड नगरपंचायतीत सुरूवातीपासूनच भाजप-सेनेची छुपी युती असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केला होता. त्यातच आता बोदवड नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी भाजपने शिवसेनेचा हात धरल्यामुळे खडसेंच्या वक्तव्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे. राज्यात जरी भाजप आणि शिवसेना हे पक्ष विरोधात असले तरी जळगावातील बोदवड नगरपंचायत निवडणुकीत ईश्वरचिठ्ठीने निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेवकाने शिवसेनेसोबत जाणं पसंत केलं आहे. भाजपचे उमेदवार विजय शिवराम बडगुजर हे शिवसेनेसोबत गेले आहेत.
Read also:
- कोर्लईमध्ये भाजप- शिवसेनेत राडा; सोमय्या येताच गोमूत्र आणि दूध शिंपडून शुद्धीकरण
- नारायण राणेंना मुंबई महापालिकेचा दणका; अनाधिकृत बांधकामप्रकरणी पालिकेची नोटीस
- टीका करतात आणि कोकणात येऊन पडतात; उदय सामंतांचा नाव न घेता राणेंवर प्रहार
- “विकासाच्या मुद्यावर राजकारण व्हावे, १५ वर्षे विरुद्ध ५ वर्षे असा सामना व्हावा”आमदार महेश लांडगे
- शिवसेनेवर शोककुळा: जेष्ठ नेते सुधीर जोशी यांचे निधन, वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास