मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. कारण शिवसेना आणि भाजपा नेत्यांचे एकमेकांवरील आरोप दिवसेंदिवस वाढत आहेत. किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात तर चांगलाच कलगीतुरा रंगला होता. त्यातच आता नारायण राणे आणि शिवसेना असा वाद पाहायला मिळत आहे.
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे आंदोलन; भाडोत्री लोकांचा एक फ्लॉप शो !
मातोश्रीच्या चार नेत्यांना लवकरच ईडीची नोटीस पाठवली जाणार असून सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियान आत्महत्या प्रकरणाचा पुन्हा तपास सुरू होईल, असं ट्वीट नारायण राणेंनी केलं होतं. या ट्वीटमध्ये त्यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांना इशारा दिला होता. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर आज विनायक राऊत, संजय राऊत आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्या आणि नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
शिवसेनेच्या आणखी एका घोटाळ्याची पोलखोल करणार; भाजप आमदार मिहिर कोटेंचा इशारा
“महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी भाजपाने आघाडी उघडली आहे. राज्यातील सरकार चांगलं काम करतंय. मात्र, भाजपाला ते सहन होत नाहीये. किरीट सोमय्यांच्या माध्यमातून मुंबईत आणि महाराष्ट्रात तीन पैशांचा तमाशा होताना दिसतोय,” असं त्या म्हणाल्या.
कल्याण-डोंबिवलीत भाजपला धक्का; चार माजी नगरसेवकांनी हाती घेतला धनुष्यबाण
तसेच “नारायण राणेंनी दिशा सालियानबद्दल काढलेले उद्गार एक महिला म्हणून उद्विग्न करणारे आहेत. तिच्या रिपोर्टला खोटं ठरवण्याचं काम केंद्रीय मंत्रीपदावरील व्यक्ती करत आहे. दिशाच्या वडिलांनी सर्वांना हात जोडून विनंती केली होती की तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जे आलं ते आम्हाला मान्य आहे. परंतु तिच्या मृत्यूला इतके दिवस उलटल्यानंतर राणेंकडून तिच्यावर बलात्कार झाल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात लक्ष घालावं आणि कारवाई करावी,” अशी मागणी पेडणेकर यांनी केली.
Read also:
- सिंधुदुर्गात आतापर्यंत ७ हत्या, राजकीय हत्यांची चौकशी करा; विनायक राऊतांची गृहमंत्र्याकडे मागणी
- एखाद्याला मुलगा झाला, तरी काही जण श्रेय घेतात; देवेंद्र फडणवीसांचा रोख कुणाकडे?
- “रिश्ते में हम आपके बाप लगते है”, संजय राऊतांचा किरीट सोमय्यावर खोचक निशाणा
- नितेश राणेंचे संचाकलपद धोक्यात येण्याची शक्यता ; जिल्हा बँकेचा थकीत असल्याने राणेंची अडचण होणार?
- मी तर भाजीवाला माणूस, त्या चंद्रकांत पाटलांनी…; छगन भुजबळांनी काढला चिमटा