ठाणे : ठाण्यातील मोडकळीस आलेल्या इमारतीतील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातच नियमावली मंजुरी केली होती. मात्र, त्याच्या अंमलबजावणीला आणखी एक वर्षभराचा कालावधी लागला. सध्याच्या काळात आपण न केलेल्या कामाचेही श्रेय घेण्याचा काही लोकांचा विषय आहे. कोणतेही काम आमच्याचमुळे झाले असल्याचा दावा केला जात आहे, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला.
राज्यात संघर्ष, मात्र स्थानिक पातळीवर एकवटले; ‘या’ शहरात भाजपने केली शिवसेनेसोबत दोस्ती
भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या निधीतून ठाण्यात दिव्यांग स्नेही उद्यान व आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून उभारलेल्या कै. वसंतराव डावखरे प्रेक्षा गॅलरीसह विविध विकास कामे आणि ठाण्यातील भाजपा नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांचे फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे आंदोलन; भाडोत्री लोकांचा एक फ्लॉप शो !
या वेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार सहस्रबुद्धे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार नरेंद्र पाटील, महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे, भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा माधवी नाईक, प्रदेश सचिव संदिप लेले, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, नारायण पवार, सुनेश जोशी, कृष्णा पाटील, अर्चना मणेरा, प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, स्नेहा आंब्रे, कविता पाटील, नम्रता कोळी, नंदा पाटील आदींची उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही जातीची संख्या न पाहता वंचितांचे राज्य उभारले. राम राज्यानुसार सर्वांना समान अधिकार दिले, तेच सूत्र पकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कल्याणकारी सरकार चालविले जात आहे. तसेच दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
Read also:
- “रिश्ते में हम आपके बाप लगते है”, संजय राऊतांचा किरीट सोमय्यावर खोचक निशाणा
- नितेश राणेंचे संचाकलपद धोक्यात येण्याची शक्यता ; जिल्हा बँकेचा थकीत असल्याने राणेंची अडचण होणार?
- मी तर भाजीवाला माणूस, त्या चंद्रकांत पाटलांनी…; छगन भुजबळांनी काढला चिमटा
- कल्याण-डोंबिवलीत भाजपला धक्का; चार माजी नगरसेवकांनी हाती घेतला धनुष्यबाण
- शिवसेनेच्या आणखी एका घोटाळ्याची पोलखोल करणार; भाजप आमदार मिहिर कोटेंचा इशारा