मुंबई : किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा पाहायला मिळत आहे. आज या कलगीतुऱ्याचा पुढचा अंक राज्यात बघायला मिळाला असून आधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मातोश्री दोनचं बेकायदा बांधकाम पैसे देऊन नियमित करण्यात आल्याचा आरोप केला. त्यानंतर शिवसेनेकडून विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन या आरोपांना ‘लाव रे तो व्हिडीओ’ स्टाईलमध्ये प्रत्युत्तर दिलं. याच पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि भाजपावर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.
कोर्लईमध्ये भाजप- शिवसेनेत राडा; सोमय्या येताच गोमूत्र आणि दूध शिंपडून शुद्धीकरण
“हे जे कुणी किरीट सोमय्या आहेत, त्यांचं गेल्या चार दिवसांपासून रोज एक प्रकरण मी देतोय. पालघरला वेवूर नावाच्या गावात त्यांचा एक फार मोठं प्रोजेक्ट सुरू आहे. त्याची किंमत २६० कोटी आहे. त्यांच्या मुलाच्या नावावर हा प्रकल्प सुरू आहे. त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या त्या प्रकल्पावर संचालक आहेत. या २६० कोटींमध्ये ईडीचे एक संचालक आहेत, त्यांचे किती पैसे आहेत हे मी विचारलं. ही बेनामी मालमत्ता ईडीच्या एका संचालकाची आहे. हे कोट्यवधी रुपये यांच्याकडे येतात कुठून?” असा सवाल राऊतांनी केला आहे.
राज्यात संघर्ष, मात्र स्थानिक पातळीवर एकवटले; ‘या’ शहरात भाजपने केली शिवसेनेसोबत दोस्ती
“आम्हाला कुंडल्या काढण्याच्या धमक्या देऊ नका. तुम्हाला तुरुंगात बसून तुमच्याच कुंडल्या बघाव्या लागणार आहेत. यांच्या कुंडल्या आहेत, त्याच्या कुंडल्या आहेत. तुमच्या कुंडल्या नाहीयेत का आमच्याकडे? हे महाराष्ट्र सरकार आहे. तुमचं असेल केंद्रात सरकार. पण महाराष्ट्र सरकार मजबूत आहे आणि आमच्या हातात देखील बरंच काही आहे. त्यामुळे उगीच पोकळ धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नका, त्यात तुम्हीच फसणार आहात”, असा टोला राऊतांनी लगावला.
Read also:
- नितेश राणेंचे संचाकलपद धोक्यात येण्याची शक्यता ; जिल्हा बँकेचा थकीत असल्याने राणेंची अडचण होणार?
- मी तर भाजीवाला माणूस, त्या चंद्रकांत पाटलांनी…; छगन भुजबळांनी काढला चिमटा
- कल्याण-डोंबिवलीत भाजपला धक्का; चार माजी नगरसेवकांनी हाती घेतला धनुष्यबाण
- शिवसेनेच्या आणखी एका घोटाळ्याची पोलखोल करणार; भाजप आमदार मिहिर कोटेंचा इशारा
- पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे आंदोलन; भाडोत्री लोकांचा एक फ्लॉप शो !