मुंबई : भाजप नेते किरीट सोमैया यांनी पेटवलेल्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेनंतर महाराष्ट्रातील राजकारण एका वेगळ्या वळणावर जाऊन ठेपले आहे. शिवसेना नेते संजय राऊत हे सोमैयांना थोपवण्याचे काम करत आहेत मात्र त्यांची जीभ वारंवार घसरताना दिसत आहे. मागे त्यांनी किरीट सोमैयांना डिवचताना त्यांना भडवा म्हटलं होतं. काल संजय राऊतांनी किरीट सोमैया यांच्या बद्दल बोलताना ‘गांडू’, ‘च्युतिया’ असे वापरले होते. त्यानंतर भाजपनं देखील संजय राऊतांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे.
नितेश राणेंचे संचाकलपद धोक्यात येण्याची शक्यता ; जिल्हा बँकेचा थकीत असल्याने राणेंची अडचण होणार?
भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की मी संजय राऊतांना सांगणार एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे. एकदाच मला शिव्यांची डिक्शनरी देऊन टाका, उगाच माझ्या आईला सारखा सारखा संताप नको, अशा खोचक शब्दांत राऊतांवर पलटवार केला आहे.
“रिश्ते में हम आपके बाप लगते है”, संजय राऊतांचा किरीट सोमय्यावर खोचक निशाणा
काल किरीट सोमैया यांना समन्स बजावण्यात आले होते. किरीट सोमैया आणि त्यांच्या २५ सहकाऱ्यांवर सांताक्रुझ पोलिस ठाण्यात कोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकऱणी पोलिसांनी समन्स बजावल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. मंत्री छगन भुजबळ यांच्या मालमत्तेची पाहणी करायला गेल्याने समन्स बजावल्याचा दावा देखील सोमैयांनी केला आहे. याचवेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर देखील आपली प्रतिक्रिया देखील मांडली होती.
Read also:
- हे लोक चु, अशा चु* लोकांना देशात स्थान राहणार नाही; संजय राऊतांची जीभ घसरली*
- पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातून पार्थ पवार ‘साईड स्ट्राईक’; भूमिका ठरवण्याची हिच ती वेळ!
- किरीट सोमय्यांचा तीन पैशांचा तमाशा; महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या
- सिंधुदुर्गात आतापर्यंत ७ हत्या, राजकीय हत्यांची चौकशी करा; विनायक राऊतांची गृहमंत्र्याकडे मागणी
- एखाद्याला मुलगा झाला, तरी काही जण श्रेय घेतात; देवेंद्र फडणवीसांचा रोख कुणाकडे?