नागपूर : भाजप नेते किरीट सोमैया यांनी पेटवलेल्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेनंतर महाराष्ट्रातील राजकारण एका वेगळ्या वळणावर जाऊन ठेपले आहे. शिवसेना नेते संजय राऊत हे सोमैयांना थोपवण्याचे काम करत आहेत मात्र त्यांची जीभ वारंवार घसरताना दिसत आहे. च्युतिया, गांडू असे शब्द प्रयोग शिवसेना नेते संजय राऊत वारंवार आणि जाणून बुजून करताना दिसत आहे.
“रिश्ते में हम आपके बाप लगते है”, संजय राऊतांचा किरीट सोमय्यावर खोचक निशाणा
कालच त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भेटीच्या आधी किरीट सोमय्या यांच्या बद्दल बोलताना सोमय्या च्युतिया, गांडू आहेत असं म्हटलं होतं. गलिच्छ भाषेत टीका करण्यावरून विरोधी भाजपने संजय राऊतांवर टीकेची झोड उठवलेली असताना संजय राऊत यांनी स्वतःचे समर्थन केले आहे.
एखाद्याला मुलगा झाला, तरी काही जण श्रेय घेतात; देवेंद्र फडणवीसांचा रोख कुणाकडे?
संजय राऊत हे आज नागरपूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांना संबोधित केले. भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलेल्या नाराजी बद्दल बोलताना राऊत म्हणाल की महाराष्ट्रात एखादा पक्ष राज्याची सतत बदनामी करीत असेल किंवा थुंकत असेल तर त्याची आरती करावी, असं ज्यांना वाटत असेल त्यांनी खुशाल त्यांची आरती करावी.
सिंधुदुर्गात आतापर्यंत ७ हत्या, राजकीय हत्यांची चौकशी करा; विनायक राऊतांची गृहमंत्र्याकडे मागणी
मी ज्या भाषेत बोललो ती अत्यंत सौम्य भाषा वापरली आहे. तसेच ज्यांना या भाषेविषयी शंका आहे. त्यांनी आपली मराठी डिक्शनरी पाहावी किंवा साधुसंतांची पुस्तक वाचावी, असा खोचक सल्ला भाजप नेत्यांना संजय राऊतांनी दिला आहे. जे महाराष्ट्रद्रोही आणि भ्रष्टाचारी आहेत, ज्यांच्या मनामध्ये महाराष्ट्राविषयी कायम द्वेष आहे, अशा लोकांना जी भाषा समजते, त्या भाषेतचं बोलावं, असं आमच्या साधू संतांनी सांगितलं आहे. हजारो मारावे एक उरावा,’ अशा पध्दतीचं राजकारण सध्या भाजपच्या नेत्यांकडून सुरु आहे. अशा लोकांसाठी शिवसेनेची एक वेगळी भाषा आहे असं देखील राऊत यांनी म्हटलं आहे.
Read also:
- नारायण राणे विरुद्ध मातोश्री संघर्ष; केंद्राने राणेंच्या ‘नीलरत्न’ बंगल्याचा घेतला बळी
- च्युतिया, गांडू म्हणण्यापेक्षा एकदा शिव्यांची डिक्शनरीच देऊन टाका; किरीट सोमैयांचा संजय राऊतांना सल्ला
- हे लोक चु, अशा चु* लोकांना देशात स्थान राहणार नाही; संजय राऊतांची जीभ घसरली*
- पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातून पार्थ पवार ‘साईड स्ट्राईक’; भूमिका ठरवण्याची हिच ती वेळ!
- किरीट सोमय्यांचा तीन पैशांचा तमाशा; महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या