उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची मागील काही दिवसांमध्ये घोषणा करण्यात आली होती. अखेरच्या टप्प्यात चुरस वाढल्यानंतर प्रचाराच्या तोफा धडाडत होत्या. भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ सरळ लढत याठिकाणी पाहायला मिळाली.
किरीट सोमय्यांचा तीन पैशांचा तमाशा; महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या
भाजपचे नेते आमदार राणा जगजितसिंह विरुद्ध शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाचा कस या निवडणुकीत लागला होता. अखेरीस ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने भाजपचा धुव्वा उडवत पंधरा पैकी पंधरा जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपला काही जागांवर उमेदवारही न देता आल्याने भाजपची पुरती दाणादाण उडाली होती.
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातून पार्थ पवार ‘साईड स्ट्राईक’; भूमिका ठरवण्याची हिच ती वेळ!
ओमराजे निंबाळकर यांनी महाविकास आघाडीची मोट बांधत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसला सोबत घेतले होते. सर्वांना सोबत घेऊन योग्य अशी सन्मानजनक उमेदवारी वाटप देखील खासदार निंबाळकरांकडून करण्यात आले होते. गेली महिनाभर गाजलेल्या जिल्हा बँकेचा निकाल आज जाहिर झाला. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनमध्ये मतमोजणी झाली. पहिल्या टप्प्यात कळंब येथील विकास सोसायटी मतदारसंघाचा कल शिवसेनेच्या बाजूने लागला. बळवंत तांबारे यांनी ४० मते घेत आघाडी घेतली. पंधरा जागांपैकी फक्त याच जागेसाठी महाविकास आघाडीला मोठी कसरत करावी लागली होती. भाजपचे यंग ब्रिगेड मैदानात उतरल्याने चुरस वाढली होती.
हे लोक चु, अशा चु* लोकांना देशात स्थान राहणार नाही; संजय राऊतांची जीभ घसरली*
शिवसेनेच्या अंतर्गत गोटात दुफळीची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू होती. ज्ञानेश्वर पाटील (शिवसेना), मधुकर मोटे (राष्ट्रवादी काँग्रेस), श्रावण सावंत (शिवसेना),सुनिल चव्हाण (काँग्रेस), बापूराव पाटील (काँग्रेस) यांनी आपल्या मतदारसंघात बिनविरोध वर्चस्व दाखविले होते. मात्र उर्वरीत मतदानासाठी काय होते? याकडे सर्वांचे लक्ष संपूर्ण जिल्ह्याचे लागले होते. अखेरीस सर्वच जागा महाविकास आघाडीच्या पदरात पडल्याने भाजपला मोठी हार पत्करावी लागली आहे.
Read also:
- महाविकास आघाडीचा प्रयोग अपयशी होणार, भाजपच नंबर वन – देवेंद्र फडणवीस
- पुणे मनपा निवडणुकीसाठी भाजपाची प्रचारात आघाडी; चंद्रकांत पाटीलांचा नव्याने समाविष्ट गावात झंझावाती प्रचार
- च्युतिया, गांडू हे शब्द सौम्य भाषेतीलच; संजय राऊतांचा नवा जावई शोध
- नारायण राणे विरुद्ध मातोश्री संघर्ष; केंद्राने राणेंच्या ‘नीलरत्न’ बंगल्याचा घेतला बळी
- च्युतिया, गांडू म्हणण्यापेक्षा एकदा शिव्यांची डिक्शनरीच देऊन टाका; किरीट सोमैयांचा संजय राऊतांना सल्ला