मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत हे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका करताना सातत्याने शिवराळ भाषेचा वापर करत असल्याचं पाहायला मिळत आहे. याचवरुन आज (21 फेब्रुवारी) सोमय्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कठोर शब्दात सुनावलं आहे.
हे लोक चु, अशा चु* लोकांना देशात स्थान राहणार नाही; संजय राऊतांची जीभ घसरली
‘संजय राऊत हे जी शिविगाळ करत आहेत त्यामुळे माझ्या कुटुंबातील माझी पत्नी, आई, सून या व्यथित झाल्या आहेत.’ असं म्हणत सोमय्यांनी राऊतांना सुनावलं आहे. यावेळी ते सोमय्या हे असंही म्हणाले की, उद्धव ठाकरे हे राऊतांतर्फे मला ही शिवीगाळ करत आहेत.
’19 बंगल्यांचा विषय काढला म्हणून मला जोडे मारण्याची भाषा.. दलाल पासून भXX पर्यंतची भाषा.. भXXचा अर्थ संजय राऊतला कळतो का? माझ्या बायकोला आणि माझ्या आईला जाऊन विचार. भXXचा अर्थ कळतो का संजय राऊतला? माझी बायको मराठी आहे. माझी सून बागायतकर.. महाराष्ट्रीयन आहे. अशा प्रकारची शिवी उद्धव ठाकरे हे संजय राऊततर्फे देतात. का? तर मी त्यांची चोरी, लबाडी, घोटाळे बाहेर काढतोय म्हणून?’
नारायण राणे विरुद्ध मातोश्री संघर्ष; केंद्राने राणेंच्या ‘नीलरत्न’ बंगल्याचा घेतला बळी
‘संजय राऊत हे जी शिविगाळ करत आहेत त्यामुळे माझ्या कुटुंबातील माझी पत्नी, आई, सून या व्यथित झाल्या आहेत. चार महिन्यांपूर्वी संजय राऊतांनी प्रचंड कौतुक केलं होतं. त्यांनी तसं पत्र देखील दिलं होतं. पण आता संजय राऊतच्या कोव्हिड रुग्णालयाचा घोटाळा बाहेर आल्यानंतर दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी मला शिव्यांची लाखोली वाहत आहे.’ असं म्हणत सोमय्यांनी या सगळ्या प्रकाराबाबत आपला संताप व्यक्त केला आहे.
Read also:
- लालू प्रसादांना दणका; न्यायालयाने सुनावला ६ वर्षाचा कारावास, काय आहे चारा घोटाळा प्रकरण….
- उस्मानाबाद जिल्हा बँकेत भाजपचा सुपडा साफ; महाविकास आघाडीचा १५-०ने मोठा विजय
- महाविकास आघाडीचा प्रयोग अपयशी होणार, भाजपच नंबर वन – देवेंद्र फडणवीस
- पुणे मनपा निवडणुकीसाठी भाजपाची प्रचारात आघाडी; चंद्रकांत पाटीलांचा नव्याने समाविष्ट गावात झंझावाती प्रचार
- च्युतिया, गांडू हे शब्द सौम्य भाषेतीलच; संजय राऊतांचा नवा जावई शोध