कर्जत : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पाटील यांनी कर्जत-जामखेडमध्ये मतदारसंघ मिसळ खातानाचे फोटो ट्वीट करत जोरदार टोलेबाजी केली. एकाच मिसळमध्ये पोट भरल्याने ३५ मिसळ खाण्याच्या केवळ कल्पनेनेच कसंतरी झाल्याचं म्हणत रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शाब्दिक चिमटा काढला. तसेच मिसळ खाल्ल्यानंतर पैसे न देताच उठून गेलो नाही, तर नेहमीप्रमाणे बिलही पेड केल्याचं सांगत भाजपाला ठाण्यातील वडापाव बिलच्या व्हायरल व्हिडीओवरून टोला लगावला.
उस्मानाबाद जिल्हा बँकेत भाजपचा सुपडा साफ; महाविकास आघाडीचा १५-०ने मोठा विजय
रोहित पवार म्हणाले, “मतदारसंघात असताना भूक लागल्याने मीही जळगावमधील राहुल हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत मिसळ खाल्ली. एकाच मिसळमध्ये पोट भरल्याने ‘३५’ मिसळ खाण्याच्या केवळ कल्पनेनेच कसंतरी झालं आणि हो मिसळ खाल्ल्यानंतर पैसे न देताच उठून गेलो नाही, तर नेहमीप्रमाणे बिलही पेड केलं.”
मतदारसंघात असताना भूक लागल्याने माही जळगावमधील राहुल हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत मिसळ खाल्ली… एकाच मिसळमध्ये पोट भरल्याने '३५' मिसळ खाण्याच्या केवळ कल्पनेनेच कसंतरी झालं..
आणि हो…
मिसळ खाल्ल्यानंतर पैसे न देताच उठून गेलो नाही तर नेहमीप्रमाणे बिलही पेड केलं. pic.twitter.com/90TgP8c9PF— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 21, 2022
रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये ३५ या अंकाचा विशेष उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला आहे. याआधी अमृता फडणवीस यांनी एका शोमध्ये देवेंद्र फडणवीस एका बैठकीत किती पुरणपोळ्या खाऊ शकतात? या प्रश्नाचं उत्तर देताना ते ३०-३५ पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे असे म्हटले होते. त्यापोठापाठ लग्नानंतर तुमची अपूर्ण राहिलेली इच्छा कोणती? हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अमृता यांनी ३०-३५ पुरणपोळ्या खाताना पाहण्याची, त्याही मी न बनवलेल्या असे सांगितले.
Read also:
- देवेंद्र फडणवीसांना नैराश्य आलयं, जास्त लक्ष देवू नका – आदित्य ठाकरे
- खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर राडा; भाजप – काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा आमने-सामने
- मी पाटील आहे, संजय राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो, पण…; चंद्रकांत पाटील
- २०२४ ला तिसरी आघाडी होणार, भाजपला सत्तेतून हद्दपार करणार; नवाब मलिकांचा दावा
- भXXचा अर्थ संजय राऊतला कळतो का? भाजप नेते किरीट सोमय्या संतापले