मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रविरोधी केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेसने भाजप खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर आज आंदोलन केलं. तत्पूर्वी मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन केलं.
मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली सकाळी भाजप खासदार मनोज कोटक यांच्या मुलुंड येथील सेवालय ऑफिसबाहेर आंदोलन करण्यात येणार होतं. मात्र, काँग्रेसचं आंदोलन सुरु होण्यापूर्वीच भाजप कार्यकर्त्यांची येथे एकच गर्दी केली होती.
महाविकास आघाडीचा प्रयोग अपयशी होणार, भाजपच नंबर वन – देवेंद्र फडणवीस
खासदार मनोज कोटक आणि आमदार राम कदम यांनी यावेळी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. येथे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमल्यामुळे पोलिसांनी मुलूंडचा आरपी रोड बंद केला होता. एमजी रोडपासून भक्ती मार्गला जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. दुपारी बाराच्या दरम्यान मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्ते येथे जमले. यावेळी त्यांना पोलिसांनी अडवलं. त्यामुळे होणारा संभाव्य राडा टळला.
Read also:
- मी पाटील आहे, संजय राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो, पण…; चंद्रकांत पाटील
- २०२४ ला तिसरी आघाडी होणार, भाजपला सत्तेतून हद्दपार करणार; नवाब मलिकांचा दावा
- भXXचा अर्थ संजय राऊतला कळतो का? भाजप नेते किरीट सोमय्या संतापले
- लालू प्रसादांना दणका; न्यायालयाने सुनावला ६ वर्षाचा कारावास, काय आहे चारा घोटाळा प्रकरण….
- उस्मानाबाद जिल्हा बँकेत भाजपचा सुपडा साफ; महाविकास आघाडीचा १५-०ने मोठा विजय