नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी यूद्धाची घोषणा केल्यानंतर रशियाकडून युक्रेनवर हल्ला चढवला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत या हल्ल्यात 9 लोकांचा बळी गेला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे सध्या युक्रेन मध्ये गोंधळाची परीस्थिती निर्माण झाली आहे. माणसं जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळत आहेत.
नवाब मलिकांच्या अटकेनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर नाचवल्या तलवारी
रशियाकडून युक्रेनची राजधानी किव या शहरावर हवाई मार्गाने हल्ला चालू आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर प्रंचड व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये युक्रेनच्या राजधानी असलेल्या कीव या शहरातून माणसं पलायन करीत आहेत. त्यामुळे रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तर रस्त्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रशियाने हल्ला केल्यानंतर युक्रेन देखील प्रतिहल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच रशियाचे पाच विमाने पाडल्याचाही दावा युक्रेन कडून करण्यात येत आहे. पुतीन यांनी युद्धाची घोषणा केल्यानंतर परीस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.
डोन्बास प्रांतावर हल्ला करण्यासह युक्रेनच्या कीव या शहरावर हल्ला केल्याने मोठी खळबळ उडाली. रशियाच्या हल्ल्याचा युक्रेनच्या सैन्यानकडून देखील प्रतिकार सुरू केला आहे. त्यामुळे परीस्थिती आणखीनच चिघळली आहे. या हल्ल्यात नंतर जे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ते अत्यंत विदारक चित्र दिसत आहेत.
Read also:
- संजय राऊत तुम्ही यापुढे आपली मुंबई म्हणू नका; नितेश राणेंचा टोला
- बांग्लादेशी मुलींना वेश्याव्यवसायात ढकलण्यात मलिकांचा मोठा हात, लवकरच पुरावे देणार- मनोज कंबोज
- महावितरणचं कार्यालयचं पेटवलं; राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला हिंसक वळण
- रशिया- युक्रेन युद्ध सुरू; पुतिन म्हणाले, युक्रेनच्या सैन्याने शस्त्रे टाकावीत, अन्यथा..;
- भाजपाचं ठरलंय… नो परफॉर्मन्स… नो तिकीट: त्यामुळेच अस्वस्थांची पळापळी…!