नवी दिल्ली : रशिया युक्रेन संघर्षाला सुरुवात झाली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी टीव्हीवरील एका निवेदनात सांगितले की, सध्या मी युक्रेनवर लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर रशियन सैन्य क्रिमियामार्गे युक्रेनमध्ये प्रवेश करत आहे. रशियन सैनिकांनी युक्रेनवर आतापर्यंत बॉम्ब हल्ले देखील सुरू केले आहेत. रशियाने युक्रेनच्या लष्कराला ‘शस्त्र खाली’ ठेवण्यास सांगितले आहे. मात्र, पुतिन यांनी पकडण्याचा आपला इरादा नसल्याचे म्हटले आहे.त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राने रशियाला हा हल्ला थांबवण्याचे आवाहन केले आहे.
भंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला! भाजपा नेत्याचा नवाब मलिकांना टोला
त्याआधी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी गुरुवारी स्पष्ट संकेत दिले होते की, रशिया येत्या काही दिवसांत युरोपमध्ये मोठे युद्ध सुरू करू शकतो. त्याच वेळी, युद्धाच्या भीतीने अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी अलीकडेच त्यांच्या रशियन समकक्षासोबतची बैठक रद्द केली. तसेच ब्लिंकेन म्हणाले की रशियाने आधीच केलेल्या गुन्ह्यांबद्दल किंवा ज्या गुन्ह्यांची तो योजना आखत आहे त्याला शिक्षा देण्यासाठी जगाने त्याच्या सर्व आर्थिक सामर्थ्याने प्रतिसाद दिला पाहिजे.
त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी रशियाच्या युक्रेनविरोधातील हालचाली पाहता नवीन निर्बंधांची घोषणा केली आहे. जो बिडेन म्हणाले, आम्ही रशियाच्या दोन मोठ्या वित्तीय संस्थांवर पूर्ण बंदी घालण्याची घोषणा करतो. रशिया यापुढे पाश्चिमात्य देशांकडून पैसा उभा करू शकणार नाही, तसेच नवीन कर्ज घेऊन आपल्या बाजारपेठेत किंवा युरोपियन बाजारपेठेत व्यापार करू शकणार नाही.
1993 च्या बॉम्बस्फोटातील नरसिंह राव यांचा अहवाल बाकी, तो आला की…; चंद्रकांत पाटीलांचा इशारा
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या डोनेस्तक आणि लुहान्स्क या फुटीरतावादी प्रदेशांना स्वतंत्र देशांचा दर्जा दिला होता आणि रशियन सैन्याला तिथे जाण्याचे आदेश दिले होते. दुसरीकडे बिडेन यांनी पुतीन यांच्या या निर्णयाचे वर्णन रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाची सुरुवात असे केले आहे.
Read also:
- भाजपाचं ठरलंय… नो परफॉर्मन्स… नो तिकीट: त्यामुळेच अस्वस्थांची पळापळी…!
- लगा लेना ED से लेकर CBI तक का जोर, लढेंगे और जितेंगे भी; मलिकांच्या समर्थनार्थ मुंबईत जोरदार बॅनरबाजी
- नवाब मलिकांच्या अटकेनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर नाचवल्या तलवारी
- दिवाळीनंतर फटाके फोडू; देवेंद्र फडणवीसांनी दिलं मालिकांच्या अटकेचं संपूर्ण स्पष्टीकरण
- गुंठेवारी नियमीतीकरण अडथळ्यांबाबत अधिवेशनात आवाज उठवणार – चंद्रकांत पाटील