मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याबाबत आता महत्वाची बातमी समोर आली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात कारवाई सुरु केली आहे. नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले आहे. कुख्यात गुंड कम दहशतवादी दाऊद इब्राहिम यांच्या डी गँगशी संबंध आणि जमिनीची खरेदी-विक्रीमध्ये नाव आल्याने नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून नवाब मलिक हे सातत्याने भाजपच्या काही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आणि इतर वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आरोप करत होते, मात्र आता त्यांच्यावरच अटकेची नामुष्की आली आहे.
मोठी बातमी: अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक, महाविकास आघाडीला मोठा धक्का
मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजप कार्यकर्ता ज्यांना संजय राऊतांनी ‘पंटर’, तो त्यांचा ‘फ्रंटमन’ आहे संबोधलं होतं त्या मोहित भारतीय(कंबोज) यांनी भाजपच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांसोबत फटाके वाजवले आहेत आणि तलवारी हातात घेऊन मिरवल्या आहेत. आज नवाब मलिक यांची कोर्टातील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर मी यावर सविस्तर बोलणार आहे आणि पत्रकार परिषद घेणार आहे असं कंबोज यांनी म्हटलं आहे. रिमांड कॉपी हाती आल्यानंतर त्यांनी गेल्या वीस वर्षात जे जे गुन्हे केले आहेत ते समोर आणेल.
कायद्याचा गैरवापर करणार असाल तर आम्ही शांत बसणार नाही; राष्ट्रवादीचा सूचक इशारा
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत नवाब मालिकांचे संबंध असल्याचे समोर आले आहे आणि त्यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार देखील ईडीच्या हाती लागले आहेत. आगामी काळात भ्रष्टाचारी नवाब मालिकांचे कपडे फाटतील असा दावा देखील मोहित कंबोज यांनी केला आहे. महाराष्ट्रात झालेल्या बॉम्बस्फोटात ज्याचा हात आहे असा माणूस उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये मंत्री राहिला, ही महाराष्ट्र आणि देशासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. यामुळं मलिकांना मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला लावावा आणि तातडीनं त्यांना पदापासून दूर करावं. तेव्हांच बॉम्बस्फोटातील पीडितांना आज खऱ्या अर्थानं न्याय मिळेल असं देखील कंबोज यांनी म्हटलं आहे.
Read also:
- दिवाळीनंतर फटाके फोडू; देवेंद्र फडणवीसांनी दिलं मालिकांच्या अटकेचं संपूर्ण स्पष्टीकरण
- गुंठेवारी नियमीतीकरण अडथळ्यांबाबत अधिवेशनात आवाज उठवणार – चंद्रकांत पाटील
- 1993 च्या बॉम्बस्फोटातील नरसिंह राव यांचा अहवाल बाकी, तो आला की…; चंद्रकांत पाटीलांचा इशारा
- मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हाही…; नवाब मलिकांवर ईडीच्या कारवाईनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
- भंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला! भाजपा नेत्याचा नवाब मलिकांना टोला