मुंबई : अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची आणखी वाढल्या आहेत. सलग आठ तासांच्या चौकशीनंतर मलिक यांना अखेर अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मलिक यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालयाने छापे टाकले. त्यानंतर सकाळपासून त्यांची चौकशी सुरू होती.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपसोबत लढणार- रामदास आठवले
एकूण चार मालमत्तांची चौकशी सकाळपासून सुरू होती. मलिक यांच्या कुटुंबीयांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची पडताळणी ईडीकडून सुरू होती. छोटा शकील आणि हसीना पारकर जिवंत असताना त्यांच्या निगडीत काही व्यवहार झाले होते. ईडीला यासंदर्भात संशय होता. अखेर ईडीने मलिकांना अटक केली आहे. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असून चोवीस तासात कोर्टात हजर करण्यात येणार आहे. यावेळी ईडीकडून मलिकांची रिमांड घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती मिळत आहे.
गुंठेवारी कायद्यानंतर जाहिरातबाजी अन् राष्ट्रवादी स्थानिक नेते ‘सपशेल फेल’
नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी सुरु होती. ईडीने सकाळी साडे सहा वाजता त्यांच्या घरी छापा टाकला होता. त्यानंतर ईडीच्या कार्यलयात तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. कारवाई झाल्यानंतर त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांकडून मेडिकल टेस्टसाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले आहे. लवकरच ईडीमार्फत त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील ड्रग्ज प्रकरण गुजरातमध्ये जाईल, या भीतीने नवाब मलिकांवर कारवाई- रोहित पवार
ED कार्यालयाबाहेर हालचालींना वेग आला आहे. आता त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी मलिकांना जे जे रुग्णालयात नेण्याची शक्यता आहे. रुग्णालयातून मलिकांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. मलिक यांच्या अटकेने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीतील दुसरा बडा नेता ईडीच्या कोठडीत सध्या आहे.
Read also:
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेसोबत लबाडी करत आहेत; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
- …तर नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करा; किरीट सोमय्यांची सरकारकडे मागणी
- …त्यामुळे किशोरी ताई यांचे आभार? नितेश राणेंनी पुन्हा मुंबईच्या महापौरांना डिवचले
- …म्हणून कमळाबाई ती लाविते काडी; मलिकांवरील ईडीच्या कारवाईनंतर अमोल कोल्हेंची कविता व्हायरल
- मोठ्या नेत्यांची नावे बाहेर काढल्याने ईडीकडून ‘राग’ काढण्याचा प्रकार सुरु : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील