मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग याची पुर्वीची स्वीय सहाय्यक दिशा सलियन हिच्या मृत्यू प्रकरणी चर्चा सध्या सर्वत्र सुरू झाली आहे. यासंदर्भात भाजप नेते नितेश राणे यांनी या प्रकरणात उडी घेतल्याने राजकीय वातावरण आणखीनच चिघळल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणासंबंधीत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. आता यावरून नितेश राणे यांनी किशोरी पेडणेकर यांना टोला लगावला आहे.
आयुक्तावरील शाईफेक प्रकरण; आमदार रवी राणा यांना न्यायालयाकडून ट्रान्झिट बेल मंजूर
आमदार नीतेश राणे यांनी सोशल मीडियावर एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी दिशा मृत्यू प्रकरण आणि मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाजे याचा काही संबंध आहे का, याबाबत विचारणा केली. यावरून राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं दिसून आलं. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी दिशाच्या कुटुंबीयांची आज भेट घेतल्यानंतर या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. त्याबाबत नितेश राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
वाचाळवीर, शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या संजय राऊतांचा उधळलेला वारू महाविकास आघाडी रोखणार का ?
नितेश राणे म्हणाले की, एका पत्रकार परिषदेनंतर खासदार संजय राऊत यांनी महापौर किशोरी ताई पेडणेकरांना ठणकावून सांगितले की, दिशा सालियन प्रकरणावर बोलू नका. परंतु महापौरताई तिथे काही थांबल्या नाहीत. त्यांनी राज्य महिला आयोगाला पत्र देखील दिले. तसेच त्यांनी काल सालियन कुटुंबीयांची भेट घेतली. याच महापौर ताईंनी काही महिन्यांपूर्वी त्यांच्या युवराजांना पेंग्विन म्हणतात याची घोषणा देखील करून टाकली. परंतु जेव्हा आदित्य ठाकरे यांनी घोषणा केली की ४५ वर्षांपेक्षा लोकांना टिकीट मिळणार नाही. हा तर त्याच्यामुळे तर नाही ना? दिशा साजन प्रकरण हा शिवसेनेच्या सत्तासंघर्षात होतय.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून दरोडेखोरांचं टोळकं सत्तेत आलंय – राजू शेट्टी
यापूर्वी किवी प्रकरण राज ठाकरे यांच्या शिवसेनेमधील घोडदौड थांबवण्यासाठी त्या प्रकारच्या बातम्या बाहेर काढण्यात आल्या. तसेच आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेला थांबवण्यासाठी हा प्रकार घडताना दिसतोय. स्वार्थासाठी का असेना. परंतु आमच्या महापौर ताईंनी दिशा सालिनला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. यासाठी त्यांचे आभार. असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता नितेश राणे यांच्या व्यक्तव्याला किशोरी पेडणेकर काय प्रत्युत्तर देतात? ते आता पहाणं महत्वाचे ठरणार.
Read also:
- …म्हणून कमळाबाई ती लाविते काडी; मलिकांवरील ईडीच्या कारवाईनंतर अमोल कोल्हेंची कविता व्हायरल
- मोठ्या नेत्यांची नावे बाहेर काढल्याने ईडीकडून ‘राग’ काढण्याचा प्रकार सुरु : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
- महाराष्ट्रातील ड्रग्ज प्रकरण गुजरातमध्ये जाईल, या भीतीने नवाब मलिकांवर कारवाई- रोहित पवार
- गुंठेवारी कायद्यानंतर जाहिरातबाजी अन् राष्ट्रवादी स्थानिक नेते ‘सपशेल फेल’
- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपसोबत लढणार- रामदास आठवले