मुंबई : राज्यात किरीट सोमय्या, संजय राऊत आणि नारायण राणे वाद चालू असताना आता नवाब मलिक यांच्यावर सुरू असलेल्या इडीच्या चौकशी वरून नवीन वाद सुरू झाला आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर इडीची धाड टाकल्याने त्यांचा सबंध किरीट सोमय्यांशी लावला जात आहे. आता याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
वाचाळवीर, शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या संजय राऊतांचा उधळलेला वारू महाविकास आघाडी रोखणार का ?
किरीट सोमय्या म्हणाले की, माझ्याकडे नवाब मलिक यांच्याविषयी थोडीफार माहिती होती. ती मी तपास यंत्रणेला दिली आहे. नवाब मलिक यांनी मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपीकडून जमीन खरेदी केली तेव्हा त्यांना पूर्ण कल्पना होती. पण आपल्यापर्यंत कोणीही पोहोचू शकणार नाही, असे मलिकांना वाटत होते, परंतु आता त्यांच्या वर इडीची चौकशी सुरू आहे. जर यातून माहिती समोर आली तर नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, असा इशारा ही किरीट सोमय्यांनी दिला आहे.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून दरोडेखोरांचं टोळकं सत्तेत आलंय – राजू शेट्टी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ईडीच्या कारवाईविषयी संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न का करत आहेत. किरीट सोमय्या याच्याकडे कुठून माहिती येते हा मुद्दा महत्त्वाचा नाही. ती माहिती चुकीची आहे का ते पहिले सांगा. असा सवाल किरीट सोमय्यांनी केला आहे. माहिती चुकीची असल्यास ईडीची कारवाई थांबवली जाईल. ही माहिती ठाकरे सरकारला होती तर त्यांनी अगोदरच कारवाई करायला पाहिजे होती. पण मी देखील कारवाई करणार नाही, तुम्हीही करू नका, ही ठाकरे सरकारची भूमिका योग्य नाही, असंही किरीट सोमय्या म्हणाले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपसोबत लढणार- रामदास आठवले
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले असल्याने त्यांच्यावर सध्या इडीची कारवाई सुरू आहे. आहेत. १९८३च्या मुंबईतील बॉम्ब स्फोटातील गुन्हेगार सरदार शाहवली खान आणि सलीम पटेल यांच्याकडून जमीन खरेदी करण्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे दाऊद इब्राहिम मनी लॉंड्रीग प्रकरणी नवाब मलिक यांची आज सकाळपासून इडीकडून चौकशी सुरू आहे.
Read also:
- …त्यामुळे किशोरी ताई यांचे आभार? नितेश राणेंनी पुन्हा मुंबईच्या महापौरांना डिवचले
- …म्हणून कमळाबाई ती लाविते काडी; मलिकांवरील ईडीच्या कारवाईनंतर अमोल कोल्हेंची कविता व्हायरल
- मोठ्या नेत्यांची नावे बाहेर काढल्याने ईडीकडून ‘राग’ काढण्याचा प्रकार सुरु : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
- महाराष्ट्रातील ड्रग्ज प्रकरण गुजरातमध्ये जाईल, या भीतीने नवाब मलिकांवर कारवाई- रोहित पवार
- गुंठेवारी कायद्यानंतर जाहिरातबाजी अन् राष्ट्रवादी स्थानिक नेते ‘सपशेल फेल’