मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याबाबत आता महत्वाची बातमी समोर आली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात कारवाई सुरु केली आहे. नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले आहे. कोणत्या कारणासाठी नवाब मलिक यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपसोबत लढणार- रामदास आठवले
नवाब मलिक यांच्यावर कारवाई झाल्यानंतर लगेचच आता भाजपकडून महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या १९ बंगल्याचं गोडबंगाल आज आम्ही राज्यपालांना समजावून सांगितलं आहे. मुख्यमंत्री असूनही १९ बंगल्यांच्या बाबतीत खोटेपणा का केला ? हे अद्यापही आम्हाला कळलेलं नाही. पाच कोटी अठरा लाखांची बेनामी संपत्ती कशी काय रातोरात उभी केली ? आणि याचं कारण काय आहे ? असा संतप्त सवालही किरीट सोमैयांनी उपस्थित केला आहे.
गुंठेवारी कायद्यानंतर जाहिरातबाजी अन् राष्ट्रवादी स्थानिक नेते ‘सपशेल फेल’
ठाकरे परिवाराने याआधी बंगले आहेत असं कागदोपत्री दाखवलं होतं. मात्र आता आरोप होण्यास सुरुवात झाल्यावर सगळे बंगले जमीनदोस्त करण्यात आले आहेत. ज्यावेळी किरीट सोमैया याबात प्रश्न विचारतात, त्याभागाची पाहणी करायला जातात तेव्हा मात्र तुम्ही गप्प बसता आणि दडपशाही करून तिथं जाऊ देत नाही. जर निवडणूक विभागाकडून तुम्ही न दाखवलेल्या ५ कोटींच्या व्यवहाराची चौकशी सुरु झाल्यास निवडणूक आयोग तुमचं पद रद्द करू शकतो याची तुम्हाला भीती वाटायला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लबाडी करत आहेत असंच आता समोर येत आहे, असं देखील किरीट सोमैया यांनी यावेळी म्हटलं आहे. एवढंच नाही तर नवाब मलिक यांचा हिशोब देखील झाला आहे आणि त्याचे कारनामे आता हळूहळू समोर येतील असं देखील सोमैयांनी म्हटलं आहे.
Read also:
- …तर नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करा; किरीट सोमय्यांची सरकारकडे मागणी
- …त्यामुळे किशोरी ताई यांचे आभार? नितेश राणेंनी पुन्हा मुंबईच्या महापौरांना डिवचले
- …म्हणून कमळाबाई ती लाविते काडी; मलिकांवरील ईडीच्या कारवाईनंतर अमोल कोल्हेंची कविता व्हायरल
- मोठ्या नेत्यांची नावे बाहेर काढल्याने ईडीकडून ‘राग’ काढण्याचा प्रकार सुरु : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
- महाराष्ट्रातील ड्रग्ज प्रकरण गुजरातमध्ये जाईल, या भीतीने नवाब मलिकांवर कारवाई- रोहित पवार