मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याबाबत आता महत्वाची बातमी समोर आली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात कारवाई सुरु केली आहे. नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले आहे. कुख्यात गुंड कम दहशतवादी दाऊद इब्राहिम यांच्या डी गँगशी संबंध आणि जमिनीची खरेदी-विक्रीमध्ये नाव आल्याने नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ८ दिवसांची ईडीची कोठडी सुनावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी ” दिवाळीनंतर फटाके फोडू ” असं म्हणलेल्या भाषणाची आता सर्वांनाच प्रचिती आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेसोबत लबाडी करत आहेत; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
नवाब मलिक यांना ८ दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. देशाशी गद्दार असणाऱ्या एका कुख्यात माणसासोबत व्यवहार केला आहे. ईडीने केलेली कारवाई ही नियमांना धरूनच केलेली आहे. मंत्री नवाब मलिकांनी अंडरवर्ल्डचा डॉन, अतिरेकी दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकरला ५५ लाख रुपये दिल्याचे ईडीकडे पुरावे आहेत. महाविकास आघाडी सरकारने आढेवेढे न घेता मलिकांचा राजीनामा त्वरित घ्यावा, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मोठी बातमी: अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक, महाविकास आघाडीला मोठा धक्का
ईडी आणि एनआयए मागील काही दिवसांमध्ये जॉईंट ऑपरेशन केली आहेत. या संदर्भात ईडीने ९ ठिकाणी सर्च ऑपरेशन केलं. त्यातून अनेक महत्वाच्या लिंक्स बाहेर आलेल्या आहेत. त्यातील एक प्रकरण मंत्री नवाब मलिक यांच्याशी थेट संबंधित आहे. नवाब मलिक यांनी ज्या सरदार वली खान आणि सरदार पटेल यांच्याकडून जमीन घेतलीय तो हसीना पारकरचा फ्रंटमॅन आहे, असं कनेक्शन फडणवीसांनी समोर आणल्याने आता खळबळ उडाली आहे.
Read also:
- गुंठेवारी नियमीतीकरण अडथळ्यांबाबत अधिवेशनात आवाज उठवणार – चंद्रकांत पाटील
- 1993 च्या बॉम्बस्फोटातील नरसिंह राव यांचा अहवाल बाकी, तो आला की…; चंद्रकांत पाटीलांचा इशारा
- मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हाही…; नवाब मलिकांवर ईडीच्या कारवाईनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
- भंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला! भाजपा नेत्याचा नवाब मलिकांना टोला
- कायद्याचा गैरवापर करणार असाल तर आम्ही शांत बसणार नाही; राष्ट्रवादीचा सूचक इशारा