मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याबाबत आता महत्वाची बातमी समोर आली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात कारवाई सुरु केली आहे. नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले होते. कुख्यात गुंड कम दहशतवादी दाऊद इब्राहिम यांच्या डी गँगशी संबंध आणि दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्यासोबत जमिनीची खरेदी-विक्रीमध्ये नाव आल्याने नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे.
कायद्याचा गैरवापर करणार असाल तर आम्ही शांत बसणार नाही; राष्ट्रवादीचा सूचक इशारा
मागील काही दिवसांपासून नवाब मलिक हे सातत्याने भाजपच्या काही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आणि इतर वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आरोप करत होते, मात्र आता त्यांच्यावरच अटकेची नामुष्की आली आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही मित्रपक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्त मंत्रालयाच्या शेजारी महाविकास आघाडीच्या नेते, मंत्री, आमदार, खासदार हे निषेध व्यक्त करणार आहे आणि महाराष्ट्रातही कार्यकर्त्यांना शांततेत आंदोलन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मालिकांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे ईडीच्या आणि नंतर न्यायालयाच्या बाहेर उपस्थित होते.
भंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला! भाजपा नेत्याचा नवाब मलिकांना टोला
मालिकांना ८ दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर आता कार्यकर्त्यांनी थेट बॅनरबाजी केली आहे. नवाब मलिक राहत असणाऱ्या परिसरात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत . ” लगा लेना ED से लेकर CBI तक का जोर ” ,”लढेंगे और जितेंगे भी ” अशा आशयाचे फ्लेक्स नवाब मलिकांच्या घराच्या आसपास झळकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे फ्लेक्स लावल्याची माहिती समोर आली आहे.
Read also:
- नवाब मलिकांच्या अटकेनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर नाचवल्या तलवारी
- दिवाळीनंतर फटाके फोडू; देवेंद्र फडणवीसांनी दिलं मालिकांच्या अटकेचं संपूर्ण स्पष्टीकरण
- गुंठेवारी नियमीतीकरण अडथळ्यांबाबत अधिवेशनात आवाज उठवणार – चंद्रकांत पाटील
- 1993 च्या बॉम्बस्फोटातील नरसिंह राव यांचा अहवाल बाकी, तो आला की…; चंद्रकांत पाटीलांचा इशारा
- मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हाही…; नवाब मलिकांवर ईडीच्या कारवाईनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया