मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना इडीने ताब्यात घेतल्यानंतरही त्यांच्यावर भाजपकडून जोरदार प्रहार सुरू आहे. भाजपचे नेते मनोज कंबोज यांनी नवाब मलिक यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. बांग्लादेशी मुलींना भारतात आणून त्यांना नवाब मलिक यांनी वेश्या व्यवसायात जाण्यास भाग पाडल्याचं मनोज कंबोज यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण आता वेगळ्याच दिशेने जात असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
1993 च्या बॉम्बस्फोटातील नरसिंह राव यांचा अहवाल बाकी, तो आला की…; चंद्रकांत पाटीलांचा इशारा
भाजप नेते मनोज कंबोज यांनी काल पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, बांगलादेश मधील काही तरूणींना भारतात आणून त्यांना नवाब मलिक यांनी वेश्या व्यवसायात ढकललं आहे. याबाबत आम्ही काही मुलींची स्टिंग आँपरेशन केली आहे. त्यांनी स्वतःहुन यासंदर्भात कबुली दिली आहे. याबाबतील सगळे पुरावे आम्ही तपास यंत्रणेकडे देऊ असं मनोज कंबोज यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखीनच वाढ होण्याची शक्यता आहे.
गुंठेवारी नियमीतीकरण अडथळ्यांबाबत अधिवेशनात आवाज उठवणार – चंद्रकांत पाटील
कुर्ल्यातील लोकांना या संदर्भात सगळी माहिती होती.परंतु ती लोक नवाब मलिक यांना घाबरत होती. हे प्रकरण फार गंभीर असून मलिक यांचा वेश्या व्यवसाय, ड्रग्ज पेडलिंग आणि देशाविरोधी कारवायांशी देखील संबंध असल्याचं कंबोज म्हणाले. त्यामुळे मी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट देऊन नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचंही कंबोज यांनी सांगितले.
दिवाळीनंतर फटाके फोडू; देवेंद्र फडणवीसांनी दिलं मालिकांच्या अटकेचं संपूर्ण स्पष्टीकरण
नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात राज्याचे महत्त्वाचे मंत्री सहभागी झाले आहेत. तर भाजपकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू आहे. राजीनामा द्यावा नाही तर आंदोलने करू असा इशारा ही भाजपकडून देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं दिसून आलं आहे.
Read also:
- महावितरणचं कार्यालयचं पेटवलं; राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला हिंसक वळण
- रशिया- युक्रेन युद्ध सुरू; पुतिन म्हणाले, युक्रेनच्या सैन्याने शस्त्रे टाकावीत, अन्यथा..;
- भाजपाचं ठरलंय… नो परफॉर्मन्स… नो तिकीट: त्यामुळेच अस्वस्थांची पळापळी…!
- लगा लेना ED से लेकर CBI तक का जोर, लढेंगे और जितेंगे भी; मलिकांच्या समर्थनार्थ मुंबईत जोरदार बॅनरबाजी
- नवाब मलिकांच्या अटकेनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर नाचवल्या तलवारी