मुंबई : शिवसेना आणि राणे कुटुंबातील राजकीय वैर आता सगळ्यांनाच माहिती झालं आहे. नवाब मलिक यांच्यावर इडीने कारवाई केल्यानंतर आता पुन्हा शिवसेना आणि राणे कुटुंबीय आमनेसामने आले आहेत. २०२४ नंतर तपास यंत्रणांनी होणाऱ्या परीणामांसाठी सावध राहा, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिल्यानंतर भाजपचे नेते नितेश राणे यांनी देखील खोचक शब्दात इशारा दिला आहे.
गुंठेवारी नियमीतीकरण अडथळ्यांबाबत अधिवेशनात आवाज उठवणार – चंद्रकांत पाटील
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर इडीने जमीन खरेदी प्रकरणी कारवाई केली आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, २०२४ च्या निवडणुकीनंतर ज्या गोष्टी घडणार आहेत. त्याची तपास यंत्रणांनी तयारी ठेवावी, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
दिवाळीनंतर फटाके फोडू; देवेंद्र फडणवीसांनी दिलं मालिकांच्या अटकेचं संपूर्ण स्पष्टीकरण
संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, जनाब संजय राऊत आपण सत्तेच्या लाचारीत ९३ मध्ये झालेले स्फोट कदाचित विसरले असाल. या हल्ल्यात २५७ मुंबईकरांनी आपले प्राण गमावले होते आणि ७१३ मुंबईकर जखमी झाले होते. या हल्ल्याच्या पाठीमागे दाऊद इब्राहिमचे नाव समोर आले होते. या प्रकरणात देखील दाऊदचे नाव आहे. तेव्हाही कॉंग्रेसचे सरकार सत्तेत होतं. या देशद्रोही दाऊदचा भागीदार म्हणून नवाब मलिक यांचं नाव समोर आलंय. असंही ते म्हणाले.
नवाब मलिकांच्या अटकेनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर नाचवल्या तलवारी
ते पुढे म्हणाले की, तुम्ही तर या सगळ्या गोष्टींचा निषेध करायला हवा. मात्र तुम्ही तर नवाब मलिक यांना वाचवण्यासाठी पुढे आलात. त्यामुळे यापूढे तुम्ही आपली मुंबई म्हणू नका. कारण सत्तेसाठी तुम्ही लाचारी विसरली आहे. नवाब मलिक यांच्या वर देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केल्यानंतर हे प्रकरण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे सध्या राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
Read also:
- बांग्लादेशी मुलींना वेश्याव्यवसायात ढकलण्यात मलिकांचा मोठा हात, लवकरच पुरावे देणार- मनोज कंबोज
- महावितरणचं कार्यालयचं पेटवलं; राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला हिंसक वळण
- रशिया- युक्रेन युद्ध सुरू; पुतिन म्हणाले, युक्रेनच्या सैन्याने शस्त्रे टाकावीत, अन्यथा..;
- भाजपाचं ठरलंय… नो परफॉर्मन्स… नो तिकीट: त्यामुळेच अस्वस्थांची पळापळी…!
- लगा लेना ED से लेकर CBI तक का जोर, लढेंगे और जितेंगे भी; मलिकांच्या समर्थनार्थ मुंबईत जोरदार बॅनरबाजी