मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याबाबत ईडीने धक्कादायक खुलासे केलेले आहेत. काल सकाळपासूनच ईडीच्या अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात कारवाई सुरु केली होती. सर्वप्रथम नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले आणि नंतर सुमारे आठ तास चौकशी केल्यानंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर आता भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील ‘डर्टी डझन्स’ मंत्र्यांची नावे किरीट सोमैया यांनी समोर आणल्याने आता महविकास आघाडीतील नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
रशिया- युक्रेन युद्ध सुरू; पुतिन म्हणाले, युक्रेनच्या सैन्याने शस्त्रे टाकावीत, अन्यथा..;
आज महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून आज नवाब मालिकांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात येत आहे. यावरून किरीट सोमैया यांनी म्हटलं आहे की महाविकास आघाडीचे नेते का आंदोलन करत आहेत हे कळण्याच्या पलीकडे आहे. ते त्यांचा वेळ वाया घालत आहेत. आज मी अर्धा डझन मंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत.
महावितरणचं कार्यालयचं पेटवलं; राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला हिंसक वळण
त्यांच्यावर आधीच तपास आणि कारवाई सुरू आहे. या डर्टी डझनमध्ये माजी मंत्री अनिल देशमुख, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक या दोघांबाबत निर्णय आला. त्यात अनिल परब आहेत आणि त्यांच्यावर आधीच प्रक्रिया सुरू झालीय. बेनामी रिसॉर्टमध्ये कायदेशीर कारवाई सुरू झालीय असं देखील सोमैया यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जरंडेश्वर कारखाना आता केव्हा जप्त होणार आहे याचीच आस लागून राहिलेली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आधीच संकटात आहेत. प्रताप सरनाईक, रविंद्र वायकर, जितेंद्र आव्हाड यांचा यात समावेश आहे. हे किती वेळा धरणे धरणार? अशी बोचरी टीका देखील सोमैयांनी केली आहे.
Read also:
- ईडीपासून काळजी घ्या, एवढा अहंकार बरा नव्हे; राजू शेट्टींचा अजित पवारांना गंभीर इशारा
- मुसलमानाला स्वतंत्र जगण्याचा अधिकार नाही का? नवाब मलिकांच्या मुलीचा सवाल
- रशिया युक्रेन युद्धाचे विचलित करणारे दृश्य; सोशल मीडियावर व्हायरल
- संजय राऊत तुम्ही यापुढे आपली मुंबई म्हणू नका; नितेश राणेंचा टोला
- बांग्लादेशी मुलींना वेश्याव्यवसायात ढकलण्यात मलिकांचा मोठा हात, लवकरच पुरावे देणार- मनोज कंबोज