मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याबाबत ईडीने धक्कादायक खुलासे केलेले आहेत. काल सकाळपासूनच ईडीच्या अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात कारवाई सुरु केली होती. सर्वप्रथम नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले आणि नंतर सुमारे आठ तास चौकशी केल्यानंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली.
नवाब मलिक यांना आता आठ दिवसांची ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतीला सलग १० तासांसाठी पाणीपुरवठा व्हावा यासाठी महावितरणच्या कार्यालयासमोर राजू शेट्टींच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन छेडण्यात आले आहे. यावेळी राजू शेट्टींनी महावितरणासहित महाविकास आघाडीच्या नेत्यांना धारेवर धरले आहे.
भाजपाचं ठरलंय… नो परफॉर्मन्स… नो तिकीट: त्यामुळेच अस्वस्थांची पळापळी…!
महाविकास आघाडी सरकारकडून सध्या जनतेची निव्वळ फसवणूक सुरु आहे. महावितरणच्या वीज निर्मितीमध्ये साखर कारखान्यापेक्षाही मोठा घोटाळा असून तो लवकरच चव्हाट्यावर आणू. कंपनीमध्ये मंत्र्यांचे लागेबंधे आहेत. महाविकास आघाडी सरकार जर शेतकऱ्यांना अशीच फसवणार असेल तर मंत्र्यांनाही तुडवू. जनतेला लुबाडायचे, त्यांच्या घरावर दरोडे घालायचे धंदे बंद करावे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.
रशिया- युक्रेन युद्ध सुरू; पुतिन म्हणाले, युक्रेनच्या सैन्याने शस्त्रे टाकावीत, अन्यथा..;
राजू शेट्टी यांनी अजित पवारांना इशारा देत ईडी ब्रम्हदेवापेक्षाही प्रभावी ठरणार नाही याची काळजी घ्या असे म्हटले आहे. राजू शेट्टी यांनी एक फोटो ट्विट केला असून त्यामध्ये ब्रम्हदेव आला तरी वीजबिल माफी नाही- अजित पवार, उपमुख्यमंत्री असा मजकूर फोटोवर आहे . त्यावर राजू शेट्टी यांनी, एवढा अहंकार बरा नव्हे ईडी ब्रम्हदेवापेक्षाही प्रभावी ठरणार नाही याची काळजी घ्या, असा सूचक इशारा पवारांना दिला आहे.
Read also:
- मुसलमानाला स्वतंत्र जगण्याचा अधिकार नाही का? नवाब मलिकांच्या मुलीचा सवाल
- रशिया युक्रेन युद्धाचे विचलित करणारे दृश्य; सोशल मीडियावर व्हायरल
- संजय राऊत तुम्ही यापुढे आपली मुंबई म्हणू नका; नितेश राणेंचा टोला
- बांग्लादेशी मुलींना वेश्याव्यवसायात ढकलण्यात मलिकांचा मोठा हात, लवकरच पुरावे देणार- मनोज कंबोज
- महावितरणचं कार्यालयचं पेटवलं; राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला हिंसक वळण