मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून कुख्यात गुंड राज्यातील सत्ताधाऱ्यांशी भेटीगाठी घेत असतांना दिसत आहेत. पार्थ पवार यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कुख्यात गुंड भेट घेत आहेत. याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावरून खासदार संजय राऊत गेल्या चार दिवसापासून मुख्यमंत्र्यांसोबत गुंडांचे फोटो ट्विट करून टिका करतांना दिसत आहेत.
हेही वाचा….“कार्यालयातून घड्याळ चिन्ह काढतांना पवार साहेबांच्या निष्ठावान कार्यकर्त्याच्या डोळ्यात आलं पाणी”, व्हिडीओ व्हायरल
आज त्यांनी शिंदे गॅंगच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा म्हणत ठाण्यातील कुख्यात गुंडाचा फोटो ट्विट केला आहे. शिंदे गँग च्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा. ठाणे पुणे परिसरात हत्या,अपहरण,सोन्याचांदीच्या दुकानांवर दरोडे..अशा दाखलेबाज गुन्ह्यात सहभागी असलेल्या या महाशयांचे स्वागत मुख्यमंत्री उत्साहाने करीत आहेत! पुणे आणि ठाणे पोलीस आयुक्तांनी या दाखलेबाज महातम्याची माहिती जाहीर करावी! गुंडांनी गुंडासाठी चालविलेले राज्य! असं राऊतांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…कॉंग्रेसला मोठा झटका..! कॉंग्रेससोबत असलेला 48 वर्षाचा प्रवास ‘या’ नेत्याने संपवला, अजित पवार गटात करणार प्रवेश ?
दरम्यान, पहिल्या दिवशी राऊतांनी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर यांचा फोटो ट्विट केला होता. त्यानतंर पुण्यातील गुंड निलेश घायवळ यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा तर तिसऱ्या दिवशी पुण्यातील नामचीन गुंड जितेंद्र जंगम यांचा फोटो राऊतांनी शेअर केला होता.
शिंदे गँग च्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा..
ठाणे पुणे परिसरात हत्या,अपहरण,सोन्याचांदीच्या दुकानांवर दरोडे..अशा दाखलेबाज गुन्ह्यात सहभागी असलेल्या या महाशयांचे स्वागत मुख्यमंत्री उत्साहाने करीत आहेत!
पुणे आणि ठाणे पोलीस आयुक्तांनी या दाखलेबाज महातम्याची माहिती जाहीर करावी!… pic.twitter.com/bHZnasDtQY— Sanjay Raut (@rautsanjay61) February 8, 2024
READ ALSO :
हेही वाचा….“राजकारणात बाप बदलण्याची नवीन पद्धत आली”, शरद पवार गटाचा जोरदार घणाघात
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्ह गेल्यानंतर आता पक्षाचा निधीही जाणार ? शरद पवार गटाला धक्का बसणार ?
हेही वाचा…“राज्यात सध्या पुतण्यांचे दिवस..!” राज्यात आणखी एका ‘काका पुतण्यात’ रंगलं राजकारण
हेही वाचा…कॉंग्रेससोबतचा 48 वर्षाचा प्रवास संपुष्टात..! मुंबईतील कॉंग्रेसचे ‘मास लीडर’ म्हणून ओळख, कोण आहेत बाबा सिद्दीकी ?
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे उतरले मैदानात , कोकण दौऱ्यानंतर आता मुंबई अन् त्यानंतर मराठवाडा