पुणे : निवडणुक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला. यानंतर पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाने डेंगळे पुल येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयावरचे पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह काढून टाकण्यात आले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्वत: च्या उपस्थितीत ही कृती करून घेतली. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्याच वेळी दुसऱ्या बाजूला त्यांनी बंडखोरांना धडा शिकवू असा निर्धार व्यक्त केला.
हेही वाचा…पक्ष फुटीनंतर ठाकरे अन् शिंदे गटात कार्यकर्त्यांचा ओघ सुरूच, असंख्य कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश
निवडणुक आयोगाच्या निकालानंतर पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर दोन्ही गट आमनेसामने आले. सकाळी कार्यालयातील अजित पवारांच्या नावाची कोनशिला शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी तोडून टाकली. तर सांयकाळी देखील दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये तु तू मैं मैं बघायला मिळाले. त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष नावावर काळी पट्टी टाकण्यात आली तर घड्याळ चिन्ह देखील काढून घेण्यात आलं. यावर छातीतून ह्यदय काढून बाजूला करावं अशी भावना आहे. २४ वर्ष ८ महिने जे चिन्ह घेऊन लढलो ते चिन्ह काढून टाकतांना यातना होतात. पण या शतकातील एका महान लोकनेत्याच्या कठीण काळात मी कार्यकर्तो म्हणून सोबत आहे याचं समाधान असल्याचं प्रशांत जगताप यांनी म्हटले.
हेही वाचा…शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला ‘या’ तीन नावांचा प्रस्ताव, सूत्रांकडून महत्त्वाची बातमी
राष्ट्रवादीच्या कार्यालयातून घड्याळ चिन्ह काढत असतांना प्रशांत जगताप यांच्या डोळ्यातून पाणी आल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. तो व्हिडीओ पोस्ट करून प्रवक्ते रविकांत वरपे यांनी भावनिक पोस्ट केली आहे. शरीरातुन कोणी तरी जीव काढून घेऊन जात असे वाटत आहे. २४ वर्ष ८ महिने झाले राष्ट्रवादी आणि घड्याळ हे मनावर बिंबलेले एक समीकरण होत. आज पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालया वरील जेव्हा हे घड्याळ चिन्ह काढले जात होत काय वेदना होत असतील ते समजु शकतो. हे दृश्य पाहून पवार साहेबांच्या निष्ठवांन कार्यकर्त्याच्या डोळ्यात पाणी उभा राहिले. येणाऱ्या काळात आम्ही पुन्हा एकदा त्याचं जोशात आणि तशाच थाटात उभे राहू हा विश्वास रविकांत वरपे यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीकरिता निवडणुक आयोगाने शरद पवार गटाला आपल्या पक्षाची नावं सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यातून शरद पवार गटाला आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असे नाव आयोगाने दिले आहे. पुण्यात यावेळी जगताप यांच्यासोबत पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, माजी आमदार जयदेव गायकवाड, माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर, श्रीकांत पाटील, मनाली भिलारे, आणि पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्या आदी उपस्थित होते.
शरीरातुन कोणी तरी जीव काढून घेऊन जात असे वाटत आहे. २४ वर्ष ८ महिने झाले राष्ट्रवादी आणि घड्याळ हे मनावर बिंबलेले एक समीकरण होत.
आज पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालया वरील जेव्हा हे घड्याळ चिन्ह काढले जात होत काय वेदना होत असतील ते समजु शकतो.
हे दृश्य पाहून पवार… pic.twitter.com/CqYJcZ4jk1— Ravikant Varpe रविकांत वरपे (@ravikantvarpe) February 8, 2024
छातीतून हृदय काढून बाजूला करावं अशी भावना आहे…!
२४ वर्षे ८ महिने जे चिन्ह घेऊन लढलो ते चिन्ह काढून टाकताना यातना होतात, पण या शतकातील एका महान लोकनेत्याच्या कठीण काळात मी कार्यकर्ता म्हणून सोबत आहे याचं समाधान आहे. pic.twitter.com/T9hk2LRhnO— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) February 7, 2024
READ ALSO :
हेही वाचा…कॉंग्रेसला मोठा झटका..! कॉंग्रेससोबत असलेला 48 वर्षाचा प्रवास ‘या’ नेत्याने संपवला, अजित पवार गटात करणार प्रवेश ?
हेही वाचा…राज्यसभेवर भाजपकडून कोण ? वरिष्ठ पातळीवर महाराष्ट्रातून पाठविली ‘ही’ डझनभर नावं
हेही वाचा…बारामतीत सुप्रियाताई सुळे विरुद्ध सुनेत्राताई पवार? भाजपच्या हायकमांडने अजित पवारांना दिल आदेश
हेही वाचा…“शरद पवारांच्या गटाला मिळालं नवं नाव, निवडणुक आयोगाने ‘या’ नावावर केलं शिक्कामोर्तब”
हेही वाचाकोल्हापुर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेवर ठाकरे गटाचा दावा, २०२४ च्या निवडणुकीसाठी उमेदवारही ठरले ?