पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षनाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर राज्यात अजित पवारांची ताकद वाढली आहे. तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांना याचा मोठा धक्का बसला आहे. यातच आता पुढील महिन्यात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांकडे आता भाजपसह मित्र पक्षांनी लक्ष केंद्रीत केलं आहे. यातच आता बारामती खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या घरातीलच उमेदवार देणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्हाच्या पाठीमागे निर्णयाच्या अदृश्य शक्तीचा हात, अदृश्य शक्ती नेमकी कोण ?
महाराष्ट्रातील भाजपच्या महत्वाचा मित्रपक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसने बारामती, सातारा, शिरूर आणि रायगड या चारही जागा खेचून घ्याव्यात, असा मनसुबा रचण्यात आला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या जागा शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिंकलेल्या आहेत.
हेही वाचा…मोठी बातमी..! शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे तीन नाव पाठवली!
शरद पवार यांनी पारंपारिक बारामती लोकसभा मतदारसंघआत कन्या सुप्रिया सुळेच आपली वारसदार असेल हे स्पष्ट केले आहे. परंतु, अजित पवार यांनी अचानक बंड करून पक्षातील बहुसंख्य आमदार हाताशी धरले आणि भाजप-शिंदे सेनेच्या सरकारमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राज्यातील सर्वच राजकीय चित्र पालटले.
सध्या ४० आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याविरूद्ध आपल्या पत्नीला उभे करावे, असे सुचविण्यात आले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीत सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढत अटळ आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांच्या गटाला मिळालं नवं नाव, निवडणुक आयोगाने ‘या’ नावावर केलं शिक्कामोर्तब”
हेही वाचाकोल्हापुर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेवर ठाकरे गटाचा दावा, २०२४ च्या निवडणुकीसाठी उमेदवारही ठरले ?
हेही वाचा…पक्ष फुटीनंतर ठाकरे अन् शिंदे गटात कार्यकर्त्यांचा ओघ सुरूच, असंख्य कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश
हेही वाचा…शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला ‘या’ तीन नावांचा प्रस्ताव, सूत्रांकडून महत्त्वाची बातमी
हेही वाचा.“जनता मूर्ख नाही, सगळं जाणते”, ‘या’ मराठी अभिनेत्रीने अजित पवार गटावर साधला अप्रत्यक्ष निशाणा