मुंबई : राष्ट्रवादी पक्षनाव आणि निवडणुक चिन्ह अजित पवार गटाला गेल्यानंतर निवडणुक आयोगाने शरद पवार गटाला आज तीन वाजपर्यंत पक्षनाव आणि निवडणुक चिन्ह सादर करण्याचे आदेश दिले होते. आगामी काही दिवसात राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यानिवडणुकीकरीता आयोगाने शरद पवार गटाला यासंदर्भात आदेश दिले आहेत. यातच आता शरद पवार गटाने तीन नाव आणि तीन निवडणुक चिन्ह्यांची नावे पाठवली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यावर निवडणुक आयोगाने शरद पवार यांना नवीन पक्षाचं नाव दिलं आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे तीन नाव पाठवली!
शरद पवार यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तीन नाव पाठवली आहेत. निवडणूक आयोगाला शरद पवार यांच्या गटाकडून याबाबत पत्र पाठवण्यात आलं आहे. त्या पत्रात तीन नाव पाठवली गेली असून आयोग त्यातलं एक नाव मान्य करण्यात आलं आहे. ऑनलाईन पद्धतीने आयोगाला हे पत्र पाठवण्यात आलं होत. यामध्ये नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी-शरद पवार, आणि नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार, नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी- एस अशी नावं पाठवण्यात आली होती. त्यातील नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार हे नाव निवडणुक आयोगाने निश्चित केलं आहे.
हेही वाचा…“तर आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवू,” महेश लांडगे यांनी दिली इशारा, प्रकरण काय ?
दरम्यान, राज्यात २७ तारखेला होऊ घातलेल्या राज्यसभेच्या निवडणुकांसाठी निवडणुक आयोगाने ‘नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’, हे नाव शरद पवार गटाला दिले आहे. यानिवडणुकीसाठी चिन्हाची आवशक्यता नव्हती. त्यामुळे निवडणुक चिन्हाबाबत अद्यापही निर्णय घेण्यात आला नाही. परंतु शरद पवार गटाकडून वटवृक्ष हे चिन्ह सुचवण्यात आल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचाकोल्हापुर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेवर ठाकरे गटाचा दावा, २०२४ च्या निवडणुकीसाठी उमेदवारही ठरले ?
हेही वाचा…पक्ष फुटीनंतर ठाकरे अन् शिंदे गटात कार्यकर्त्यांचा ओघ सुरूच, असंख्य कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश
हेही वाचा…शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला ‘या’ तीन नावांचा प्रस्ताव, सूत्रांकडून महत्त्वाची बातमी
हेही वाचा.“जनता मूर्ख नाही, सगळं जाणते”, ‘या’ मराठी अभिनेत्रीने अजित पवार गटावर साधला अप्रत्यक्ष निशाणा
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्हाच्या पाठीमागे निर्णयाच्या अदृश्य शक्तीचा हात, अदृश्य शक्ती नेमकी कोण ?